या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ अकबर बादशहा. मूद लोदीच्या निशाणाखालीं एक लाख सैन्य जमले होते. शिवाय, बाबराच्या स्वतःच्या सरदारांपैकीं शेरखान नांवाचा सरदार, ज्यास त्यानें मोठ्या लौकिकास चढविलें होतें, तो बंडवाल्यास जाऊन मिळाला होता. आपल्या फौजेसह त्यानें बनारस शहर घेतलें होतें; व त्या पवित्र नगरी पासून १३ कोसांवर चनारचे किल्ल्यास महमूद लोदी वेढा घालीत होता. बाबर एकदम चाल करून पुढे गेला व त्याने महमूद लोदी या चनारचा वेढा उठवावयास लावून शेरखानास बनारसेहून गंगापार हांकून दिलें. नंतर त्याने कर्मनाशा ओलांडिकी; व गंगा, कर्मनाशा च बक्सार यांचे संगमावर चौसार व बक्सार ह्यांचे पलीकडे तळ दिला. तेथून निघून शत्रूंस मार्गे हटवीत हटवीत बाबर आरा येथें मोंचला. येथें त्यानें बिहारचें राज्य खालसा केलें, व याच ठिकाणीं त्यास बातमी कागली कीं महमूद लोदी थोड्याशा अनुयायांनिशीं बंगालच्या राजाच्या आश्रयास जाऊन राहिला आहे. बंगालचा राजा नसरतशहा यार्ने महमूद लोदीच्या पुतणीशीं लग्न काविलें होतें. त्याचा बाबराशी असा करार झाला होता कीं उभयतां राजांनी परस्परांच्या मुलुखांवर स्वारी करूं नये. परंतु हा करार मोडून त्यानें सारण प्रांत घेतला होता; व गोग्रा आणि गंगा यांच्या संगमापाशीं सहसा शत्रूस घेतां येणार नाहीं अशा जागीं सैन्यासह तळ देऊन तो बसला होता. हे सैन्य येथून हांकून द्यावे असा बाबराने निश्चय केला. हा हेतु सांधण्यास एकच मार्ग होता, हे त्याच्या लक्ष्यांत तेव्हांच आर्के. तो कोणता तर मनगटाचा जोर. त्यानें आपल्या सैन्याच्या सहा तुकड्या केल्या. यापैकीं चार तुकड्या अस्कारीच्या ताब्यांत दिल्या. अस्कारी या वेळीं गंगेच्या डाव्या बाजूस होता. त्यास असा हुकूम होता कीं त्यानें गोग्रा. नदी ओलांडावी व शत्रूंवर चालून जाऊन ते आपला तळ सोडतील अशी खटपट करावी व तसे झाल्यावर गोप्रा नदीच्या कांठाने त्यांचे जवळ जवळ असावें. बाकीच्या दोन टोळ्यांचे