या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ वा. ३९ अधिपत्य स्वतः घेऊन, बेत केला कीं प्रथम गंगा व नंतर गोग्रा उत- रून शत्रूंवर हल्ला करावा, व त्यांस पूर्वीच्या तळाच्या जागीं येऊं ही देऊ नये. ही योजिलेली घटना तारीख ६ मे रोजी पूर्णपणे सिद्धीस गेली. बंगालच्या सैन्याचा अगदी पराभव झाला व ह्या एका जयाने शत्रु पूर्ण- पर्णे जेरीस आला. तेव्हां खालील अटींवर बंगालच्या राजार्शी तह करण्यांत आला ;- ( १ ) हल्ली आपण ज्यास पश्चिम बिहार ह्मणतों तो प्रांत बाबर यास द्यावा; (२) उभयतां राजांनी एकमेकांच्या शत्रूंस कुमक करूं नये, व . ( ३ ) परस्परांनी एकमेकांच्या मुलुखांस उपद्रव देऊं नये. येथवर या शूर व प्रसिद्ध पुरुषानें र्जे आत्मवृत्त लिहिलें आहे त्याचाच मुख्यत्वें आधार धरून त्याच्या चरित्रांतील ठळक ठळक गोष्टींचें थोड- क्यांत वर्णन झालें. राहिलेला भाग अल्पच आहे. बिहारमधील मोहीम फत्ते करून परत आल्यावर थोड्याच दिवसांत बाबराची प्रकृति क्षीण होत चालली. ही गोष्ट लपवितां येईना व त्याचा वडील मुलगा हुमायून बकशांन येथें सुभेदार होता त्यास ही बातमी समजली. त्या राजपुत्राने तेथील कारभार आपला भाऊ हिंदाल याच्या स्वाधीन केला व आपण ताबडतोब आग्यास येण्यास निघाला. तो तेथें १९३० च्या प्रारंभ दाखल झाला. .: त्याचे स्वागत फार प्रेमपूर्वक झार्के. . हुमायून हा रसिक, विनोदी व रंगेल अशा स्वभावाचा असल्या- मुळें त्यास पुष्कळ स्नेही झाले. सहा महिने झाले नाहींत तोंच हुमायून यास जबर दुखणें आलें. दुखण्याच्या ऐन भरांत, राजपुत्र आतां वांचत नाहीं अशी निराशा झाली असतां एक गोष्ट घडून आली तीवरून बाबराचे पुत्र-वात्सल्य व निरपेक्षता हीं निभ्रांतपर्णे दिसून येतात. या गोष्टीचें वर्णन बाबरानें लिहिलेल्या आत्मवृत्तास त्याचें भाषांतर करणाऱ्यांनी पुर-. वणी दाखल जोडिलेल्या भांगांत केलें आहे तें असेंः- “औषधोपचारांचा जोर चालेनासा होऊन सर्व आशा खुंटली होती ; व चतुर दरबारी बाद