या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४० अकबर बादशहा. शहाशी शहाजादाची अवस्था कठीण आहे अर्से बोलावयास लागले होते. तेव्हां, धार्मिकपणा व विद्वत्ता ह्यामुळे परम पूज्य मानिलेल्या अबुलवाका नामक उमरावाने एके दिवशीं असें सांगितलें कीं, अशा प्रसंगों आसन्न- मरण मनुष्याचे कोणी आप्तानें जर त्याचे जिवाबद्दल स्वतःस अत्यंत प्रिय अशी वस्तु अर्पण केली तर परमेश्वर कधीं कधीं तिचा स्वीकार करतो. हे शब्द ऐकून बाबर एकदम मोठ्यानें म्हणाला की जसा हुमायुनाचा जीव मला अतिशय प्यारा आहे तसाच त्याला ही माझा जीव प्रिय आहे. सबब मुलाच्या चित्राकरितां मी आपल्या जिवाचा बळी परमेश्वरास - अत्यानंदानें अर्पण करितों व त्यास अशी प्रार्थना करितों कीं हे देवा कृपा करून तूं तो ग्रहण कर.” तेव्हां "हे काय म्हणून दरबारांतीक मंडळींनी बाबराचा अनेक प्रकारें निषेध केला पण तें सर्व व्यर्थ. त्यानें आपला निश्चय म्हणून सोडिला नाहीं. मरणोन्मुख झालेल्या आपल्या मुलाच्या बिछान्या भोंवतीं त्यानें तीन प्रदक्षिणा घातल्या ( असा विधि मुसलमान लोक बळी देण्याचे वेळीं करितात ) व नंतर, एकीकडे जाऊन अंतःकरणपूर्वक परमेश्वराची प्रार्थना केली. नंतर कांहीं वेळानें " मीं अर्पण केलें तें माझ्या मुलाला मिळालें, खचित मिळालें " असें त्याचे शब्द, मोठ्यानें म्हटलेले लोकांनीं ऐकिले. मुसलमान इतिहास - कार असें सांगतात तत्क्षणींच हुमायुनाच्या प्रकृतीस आराम पडूं लागला व त्याच प्रमाणानें बावराची शक्ति क्षीण होत चालली. इ. स. १५३० च्या अखेरपर्यंत बाबर अधिकाधिक आजारी होऊन मृत्यूश झगडत होता. शेवटीं तारीख २६ दिसेंबर रोजीं, त्याचा आत्मा इह- लोकाहून परमेश्वरापाशीं गेला. आग्र्याजवळीक चारबाग नांवाच्या महालांत त्याचा अंत झाला. त्यावेळीं त्याचें वय ४९ वर्षांचें होतें. याच्या अंतकाळच्या इच्छेनुरूप त्याचे प्रेत काबूल येथे नेलें व तें तेथून एक मैलावर रमणीय स्थळीं पुरिलें. ज्यांनीं दिग्विजय गाजवून देशय्या देश मिळविले अशा विख्यात