या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ अकबर बादशहा. बाबर यास चार मुलें होतीं. पैकीं पहिला, महमद हुमायून मिरंझा, हा तारीख ५ एप्रील १५०८ रोजी जन्मला व बापाच्या मागून गादीवर बसला. राहिले तिघे कामरान मिरझा, हिंदाल मिरझा, व अस्कारी मिरझा. मरणापूर्वी त्यानें आपल्या अमात्य मंडळीची मुद्दाम सभा भरवून हुमायु - नास आपल्या पश्चात होणारा बादशहा ह्या नात्यानें त्यांस भेटविलें होतें व चिरंजीवांस अंतकाळीं सदुपदेश ही केला होता. त्यांत पुढील गोष्टी मोठ्या महत्वाच्या ह्मणून सांगितल्या होत्या. पहिली, परमेश्वरासंबंध व मानवजातीसंबंधीं जो आपला कर्तव्यधर्म आहे तो मानोभावें पाळिला पाहिजे. दुसरी इनसाफाची बजावणी फार नेकीनें व तत्परतेने करावी. तिसरी, अपराध्यांस शिक्षा तर करावी पण ती करतांना जे मूर्ख व पश्चा- ताप झालेले असतील त्यांना दया व क्षमा दाखवावी व गरीब व अनाथ असतील त्यांस आश्रय द्यावा. या शिवाय, आपल्या बंधूंशी स्नेहानें व ममतेनें वागण्याविषयीं त्यानें हुमायुनास विनवून सांगितलें. . हिंदुस्थानांत मोंगल राज्याचा पाया घालणाऱ्या मुख्य व अलौकिक वीराचा याप्रमार्णे ऐन भर ज्वानींत शेवट झाला. वायव्येकडील प्रांत व मध्य हिंदुस्थानांतील कांहीं मुलूख काबीज करून त्यानें त्यांवर आपल्या घराण्याचा प्राचीन वहिवाटीचा हक्क संपादून ठेविला होता. याच्या अंगीं अलौकिक गुण होते खरे. परंतु, आजपर्यंत पृथक् असलेल्या राज्याचे भाग एकवटून जेर्णेकरून त्यांचें सम्मीलन होईल अशी राज्यपद्धति हिंदुस्थानांतील जिंकलेल्या प्रदेशांत सुरू करण्यास त्यास अवकाश व संधि मिळाली नाहीं. तो महापुरुष होता खरा; परंतु नवीन कायदे करून व नवीन राज्यपद्धति प्रसृत करून जशी तोड- ण्याची तशी जोडण्याची कला त्याजपाशीं होती कीं नाहीं याबद्दल संश- यच आहे. तशी कला त्याचे अंग असल्याचा कोठें प्रत्यय नाहीं. काबूल व हिंदुस्थान या दोन्ही ठिकाणीं त्यानें पूर्वी होऊन गेलेल्या विजयी पुरुषांचीच राजनीति चालविली. या राज्यपद्धतीचें तत्व येवढेच होते