या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ वा. ४५ दीन महमद अकबर हैं ठेविलें. ही हिंदुस्थानच्या इतिहासांत फारच महत्वाची गोष्ट कशी घडून आली यार्चे वृत्त आतां निरूपण करूं. इ० स० १५४१ त हुमायुनाचे सैन्य बक्कर येथें वेढा घालण्यांत गुंतलें होतें व सेवान नांवाच्या श्रीमान प्रदेशावर स्वारी करून काबीज करण्याचे काम त्याचा सापत्न बंधु हिंदाल याजकडेस सोंपविलेलें होतें. हुमायुनाचें मन हिंदाल याच्या मसलतींविषयीं साशंक होऊन पाटर शहरीं त्याची व आपली गांठ व्हावी असा त्यानें योग घडवून आणिला. हें शहर सिंधु नदाच्या पश्चिमेस वीस मैलांवर आहे. तेथें हिंदाळ आपल्या अमीर उमरावांसह पूर्ण बादशाही थाटाचें स्वागत करण्यास सर्व तयारी- निशीं सिद्ध असल्याचें हुमायुनाच्या दृष्टीस पडलें. आगत स्वागताचे उत्सव चालू असतां हिंदालच्या आईनें हुमायुनास मोठी थाटमाटाची मेजवानी केली, व त्याप्रसंगी तिर्ने दरबारच्या एकूण एक स्त्रियांस निमंत्रण केलें होतें. त्यामध्यें हमिदा नांवाची एक अति लावण्यवती कन्यका हुमायुनाच्या दृष्टीस पडली. ती हिंदालचा गुरु एक अमीर होता त्याची मुलगी होती. हिच्या सौंदर्याला हुमायून इतका भुलून गेला की तिला मागणी घातली आहे किंवा नाहीं याजबद्दल त्याच ठिकाणीं त्यानें चौकशी केली. तेव्हां असें कळले की तिची मागणी झाली आहे परंतु वाग्दानाचा विधि अद्याप झाला नाहीं. " असें आहे तर मी तिच्याश लग्न लावणार" असें हुमायून बोलला. या अकल्पित निश्चयाचा हिंदालनें.. निषेध केला व अशी धमकी दिली कीं आपण हा बेत तडीस नेल्यास मी आपल्या सेवेंत राहणार नाहीं. या गोष्टींत उभयतां बंधूंत कलह माजला व त्याचा अंत दोघांची जन्माची दुफळी होती असें वाटलें. परंतु, या विवाहसंबंधास हिंदालची आई अनुकूल असल्यामुळे तिनें गळ • घालून मुलास राजी करून घेतलें. दुसरे दिवशीं हुमायून व हमिदा यांचे लग्न लागलें. तेवेळीं तीस चवदावें वर्ष नुकतेच पुरें झालें होतें. पुढें थोड्याच • दिवसांनीं तें आनंदी जोडर्पे बक्करचे समोर दिलेल्या तळांत जाऊन पोहोंचलें.