या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६ अकबर बादशहा. हुमायुनास काल प्रतिकूळ होता यामुळे त्याचे सर्व बेत फसले. इ० स० १९४२ च्या वसंत ऋतूंत जीव बचावण्याकरितां पळ काढून आपल्या अल्पवयस्क रमणीसह त्यास मारवाड्याच्या रुक्ष वाळवंटांत आश्रा घ्यावा लागला. आगस्ट महिन्यांत ते जैसलमेर येथे पोहचले. परंतु तेथील राजानें त्यांस परत लाविलें. तेव्हां त्यांना फिरून मारवा - डर्चे वाळवंट ओलांडून जावें लागलें; व वाटेंत पाणी न मिळाल्यामुळे त्यांचे फार हाल हाल झाले. त्यांनी वाटेचे कष्ट मोठ्या हिमतीनें सोशिले व नेटाने प्रवास करून तारीख २२ आगस्ट रोज ते त्या रणाच्या सरहद्दीवरील अमरकोटच्या किल्ल्यांत दाखल झाले. तेथील राण्यानें त्यांचें आदरपूर्वक आतिथ्य करून त्यांस ठेवून घेतलें. याच ठिकाणीं रविवार तारीखं १५ आक्टोबर रोजीं हमिदा बेगम प्रसूत होऊन तिला. अकबर झाला. यापूर्वी चारच दिवस हुमायून अमर- कोटाहून निघून जून प्रांतावर स्वारी करण्यास गेला होता. पुत्र झाल्याची आनंदाची खबर कळतांच ह्याच्या मुखांतून जे उद्गार निघाले ते नमूद करण्यालायक आहेत. त्याच्या समागर्मे असणाऱ्या एका अनु- यायानें असें लिहून ठेविलें आहे की :-- “ बादशाहानें पुत्र दिल्याबद्दल ईश्वराची कृतज्ञतापूर्वक प्रार्थना केल्यावर लागलींच अमीरांच्या मुला- खती झाल्या व त्यांनीं त्याचें अभिनंदन केलें. मग, त्यानें "टेझकेरे अलवकियत” नामक पुस्तकांचा कर्ता इतिहासकार जोहर यास हा मारून विचारलें कीं मीं तुमचे जवळ काय काय दिले आहे. तो ह्मणालाः—खाविंदानीं मजजवळ २०० शाहारुखी सोन्याची नाणीं, एक चांदीचें कर्डे, व एक कस्तुरीची पिशवी इतक्या जिनसा दिल्या होत्या. त्यापैकी पहिल्या दोन त्यांच्या मालकास परत दिल्या." यावर कस्तुरीची थैली घेऊन या, असा हुकूम फरमाविला गेला; ती आणि- ल्यावर एका चिनी ताटांत ती कस्तुरी ओतली व ती पुत्रोत्सवाचा बाद- शाही नजराणा ह्मणून आपल्या अमीरांना वांटून दिली. या गोष्टीचा •