या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ वा. ४७ परिमल वाटलेल्या कस्तूरीप्रमाणे सर्व जगांत पसरला असें जें जोहराने आपले इतिहासांत लिहून ठेविलें आहे, तें यथार्थच आहे. पुत्र जन्मानें हुमायुनाचा भाग्योदय लागलींच झाला असें नाहीं. इ० स० १५४३ च्या जुलै महिन्यांत त्यास सिंधदेश सोडावा लागला. तेव्हां बायको मूल व थोडेसे नौकर चाकर यांसह तो कंदाहारासा इराद्याने निघाला. तो शाल एथें पोर्होचला. इतक्यांत त्यास असें समजलें कीं आपला भाऊ अस्कारी मोठ्या सैन्यानिशीं जवळपास आहे, सबव आपणास ताबडतोब पळ काढला पाहिजे. तो व त्याची बायको या कामास तयार होतीं, परंतु मुलाचें काय करावें हें त्यांस सुचेना. मुलगा नुक्ताच वर्षाचा झाला होता, व त्या कठीण ऋतूंत घोड्यावर घालून झपाट्याच्या मजला मारण्यास तो अगदींच अक्षम होता. या लहान अर्भकाश त्याचा चुलता लढणार नाहीं, अशी बहुतेक योग्य अशीच अटकळ करून त्यांनी त्या मुलास दाई व दासीजन व डेरे व राहुट्या यांसह तेथेंच ठेवून जाण्याचा निश्चय केला. नंतर, त्यां ठिकाणाहून त्यांनीं प्रयाण केलें व ते घोडे पिटाळीत इराणचे सरहद्दीवर सुखरूप जाऊन पोहोंचले. ते शालहून निघाले नाहींत त मिरझा हां तेथें दाखल झाला. ह्मणून अस्कारीचा हिरमोड झाला; परंतु तो कांहीं मिष्ट भाषणे बोलून कोणास समजूं दिला नाहीं ; व त्या कोमल राजकुमाराला ममतनें वागवून त्त्याला कंदाहारास,—जेथें तो सुभेदार होता तेथें, - घेऊन जाऊन आपल्या बायकोच्या ताय्यांत मोठी ठेव ह्मणून दिलें. व त्याच्या समागमें अस- केल्या दायांसही त्याचे तैनातींत ठेविलें. भाऊ हातीं न सापडतां पळून गेला या बेगमने एक वर्षभर ( १५४४ ) त्या राजपुत्राची जोपासना मोठ्या आस्थेने केली; परंतु पुढील वर्षाच्या आरंभीच तो निराळ्या स्थितीत गेला. त्याच्या बापास इराणचा शाहा तमस्प यानें सैन्य दिलें क्यासह त्यानें अरण्यामधून तडक कंदाहाराकडे मोर्चा फिरवून पश्चिम