या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ अकबर बादशहा. अफगणिस्थानावर स्वारी केली. ह्या मोहिमेनें कामरान यास अशी भीति पडली कीं हुमायून कदाचित् आपल्या मुलास घेऊन जाईल; सबब त्याची काबूल एथें रवानगी करून द्यावी असा त्यानें कंदा- हारास सक्त हुकूम पाठविला. ज्या विश्वासू कामदारांकडे ही काम- गिरी सोपविली होती ते कंदाहार येथे दाखल झाल्यावर अस्कारी मिर- झाच्या प्रधान मंडळींनीं कामरानाच्या हुकुमाची तामिली करावी किंवा नाहीं याचा विचार करण्याकरितां दरबार भरविलें. हुमायुनाचे ग्रह या वेळीं उच्च आहेत असें समजून बऱ्याच लोकांनी अशी सल्ला दिली कीं त्याच्या मरातबेस योग्य अशा इतमामासह अकबराची त्याचे बापाकडे रवानगी करून द्यावी. दुसऱ्या कित्येकांचें मत असें पडलें कीं, शहाजादा अस्कारी आपला ज्येष्ठ बंधु जो हुमायून त्याच्याशीं अति- शय बेइमानाने वागला आहे, ह्मणून आतां त्यानें किती ही पश्चात्ताप दाखविला तरी हुमायुनापाशीं तो व्यर्थच जावयाचा ; सबब, आपण कामरानाची मर्जी संपादन करणें हेंच श्रेयस्कर आहे. ही दुसरी सल्ला बहुमतानें पसंत पडली व नेहमींपेक्षां ते वर्षीचा — हिवाळा अतिशय कडाक्याचा असतांही त्या कोमल राजपुत्राची व त्याची धाकटी बहीण बक्षीवानु बेगम हिची त्यांच्या दासदासीनिशीं काबुलास रवानगी झाली. मार्गात बरेच जोखमीचे प्रसंग आले व बंदोबस्ताकरितां असलेल्या लोकांस अशी धास्ती वाटली कीं राजपुत्रास पळवून नेतात कीं काय कोण जाणे. अखेरीस ते कात्रुलास सुखरूप जाऊन पोहोंचले. कामरानार्ने आपला पुतण्या बावरची आवडती बहीण खानझादा बेगम हिच्या स्वाधीन केला व तीस त्याचे संगोपन करण्यास सांगितलें. तिनें आपल्या जवळ असतांना त्या मुलाचा प्रतिपाळ फारच काळजी पुरस्कर केला व आरंभापासून त्याच्या संनिध असलेले दासदासी व नौकर चाकर त्याच्या तैनातींत तसेच कायम राहू दिले. दुर्दैवें करूनही नोपासना फार दिवस टिकली नाहीं. पुढील सेप्टेंबर महिन्यांत (१९४५)