या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ वा. ४९ हुमायुनानें कंदाहार काबीज केलें ; तेव्हां कामरान मोठ्या पेचांत सांपडला; व त्याची अगदी गाळण झाली. त्याचा स्वभाव संशयी व मत्सरी असा होता व त्यास असें वाटत होतें कीं अकबर हा आपल्यापाशीं एक भारलेला ताईत आहे व त्याचे योगानें हुमायुनास अगर्दी आपल्या मुठीत ठेवितां येईल. ह्मणून त्यास त्याचे आजीच्या ताब्यांतून काढून कुचकिलन नांवाच्या एका विश्वासू आश्रिताच्या जिंमेस दिलें. त्यावेळी राजकीय घडामोडी फारच झपाट्याने होत असत. कंदाहार येथें आपल्या सत्तेचा पाया मजबूतपणे उभारून हुमायून सैन्यासह काबुला - वर चाल करून गेला. तो नर्वेबरच्या पहिल्या आठवड्यांत त्या शहरा- समोर जाऊन दाखल झाला व १५ वे तारखेस तें त्यानें हस्तगत करून घेतलें. कामरान गिझनीस पळून गेला; परंतु या प्रसंग चिरवियुक्त मुलाची भेट झाल्यामुळे हुमायुनास परमाल्हाद वाटला. मुलाची आई हमिदाबेगम ही पुढीलवर्षाच्या वसंतकालपर्यंत तेथें दाखल झाली नाहीं ; तथापि हुमायुनानें अकबरास कुचकिलनचे ताब्यांतून काढून त्याचा पूर्वीचा प्रतिपालक अटकाखान याची पुनः ह्या कामावर नेमणूक केली. राजपुत्राचा सांभाळ प्रथमतः याजकडेसच सोपविला होता. याचें खरें नांव गझनीचा शमसुद्दीन महम्मद हें होतें. ११४० साली शेर- शहाशी झालेल्या लढाईत यार्ने हुमायुनचा जीव वांचविला होता. . ह्याप्रमाणें अकबरचे कांहीं दिवस मोठे ऐश्वर्यंत व थाटांत गेले- परंतु, ही दोन प्रहरची सावली फार वेळ राहिली नाहीं. हिंवाळा आला तेव्हां हुमायुना त्या कडक थंडीचे दिवस, दरम्यान काबीज केलेल्या बदकशान प्रांतांतील कीलाजफर ह्या ठिकाणीं घालवावे असा निश्चय केला. तेथें जात असतां मार्गात त्यास इतकें भयंकर' दुखणे आलें क त्यांतून तो वांचेल असा संभव दिसला नाहीं. दोन महिने तो अगर्दी अथंरुणास खिळून होता. पुढें ईशकृपेनें त्यास आराम पडला ; व प्रकृति पूर्ववत झाली. परंतु या अवकाशांत त्याचे बरेचसे अमीर, उमराव