या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ वा. ५१ चरित्र लिहिलें आहे त्यांत याविषयीं आलीं वर्णन केलें आहे तसेंच लिहिलें आहे. कामरान बदकशानाकडे पळाला व हुमायून त्याचा पाठलाग करीत तिकडे गेला. परंतु पुढील हिंवाळ्यांत त्याचे कित्येक बलाढ्य सरदार फितूर होऊन कामरानास जाऊन मिळाले. हुमायुनानें अनेक वेळां स्वाऱ्या केल्या; व माघार ही खाल्ली. नंतर इ० स० १९४८ चे उन्हा- ळ्यांत उत्तरेकडील राज्यांचा पक्का बंदोबस्त करण्यासाठी निकराचे एक युद्ध करावें असा त्यार्ने निश्चय केला. पुढील जून महिन्यांत अकबर व त्याची आई यांस समागमें घेऊन तो कावुलाहून स्वारी करण्यास निघाला. गुलवादान येथे दाखल झाल्यावर त्यानें त्या मायलेकांस काबूल येथें पुनः परत पाठविलें व आपण जातीनें तालीकानावर हल्ला करून कामरानास शरण यावयास लाविलें. याप्रमाणें उत्तरेकडील मुलुखांत स्थिरस्थावर करून तो बादशहा - हुमायुनास अद्याप याच किताबाने हाक मारीत - काबुलास परत गेला. बल्खवर हल्ला करण्याकरितां १९४९ च्या वसंत कालाच्या अखेरीस तो तेथून पुनः निघाला. ते वेळीं बल्ख हें पश्चिम कंदज प्रांतांत असे. परंतु युझवेक लोकांनीं ह्याचा पराभव करून त्यास परत लाविलें व तो काबुलास १५५० चा हिवाळा घालविण्याकरितां पुनः परत आला. यानंतर एक फारच विलक्षण गोष्ट घडून आली. त्याचा भाऊ कामरान,— ज्याने सहाय्य न केल्यामुळेच मुख्यत्वेकरून हुमायुनाची बल्खवरील मोहिम फसली, — त्यानें नंतर हुमायुनाविरुद्ध उघड उघड बंड केलें व आस्कवर मोहीम केली पण ती फसली व अति अनर्थकारक झाली. शेवटीं तोच कामरान हुमायुनास शरण आला. तेव्हां हुमायुनानें काबूलचें राज्य अकबराच्या स्वाधीन केलें - त्यावेळीं त्याचें वय कायतें ८ वर्षांचे होतें - व त्याच्या जवळ त्याचा गुरु महंमद कासीमखान विरलास यास ठेविलें व आपण राजधानीहून कामरान एकदां आपले ताब्यांत घेण्या-