या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४ )

ती त्यास चांगलीशी साधली नसेल हैं तो जाणून आहे. तथापि, त्यां- तीळ दोष विद्वज्जनांच्या परीक्षणांनी कळून आल्यास दुसरी एखादी तस- बीर उतरण्याच्या कामी मदत होईल, येवढ्याच हेतूनें ही देशभाषेची केलेली अल्पसेवा महाराष्ट्र देशांतील विद्वज्जनापुढे आणिली आहे.
भाषांतर छापून प्रसिद्ध करण्याच्या कामी अनेक अडचणी आल्या. त्यांतून पार पाडण्याकरितां माझे जुने सहाध्यायी प्रोफेसर दामोदर गणेश पाध्ये एम्. ए. यांनीं साह्य केलें. शिवाय, त्यांनीं हें समग्र पुस्तक वाचून तपासिलें व अनेक योग्य फेरफार करण्याची कृपा करून तसदी घेतली याकरितां याठिकाणीं त्यांचे आभार मी आनंदानें मानतों.
एका आधुनिक नाट्याचार्यानें झटल्याप्रमाणे - " जाणुनिया अवसान नसोनी महत्कृत्यभर शिरिं घेतों-" मी हा लहानातोंडी मोठा घास घेतला व तो शेवटास कसा जाईल याची मोठी चिंता होती. परंतु गुरुवर्य रा. रा. विष्णु मोरेश्वर उर्फ अण्णा साहेब महाजनी यांचा उप- देश –“ ”आपण अपुलें कर्म करावें चिंता सारी प्रभु वाही" - मनांत ठेवून आरंभिलेले कार्य अव्याहत सुरू ठेविलें व तें प्रभुकृपेनें तडीस गेलें; यास्तव त्याचे अनन्यभावें उपकार स्मरून व पदोपदीं आभार मानून ही प्रस्तावना अटोपती घेत.

येवतमहाल,
तारीख १ माहे एप्रिल, १८९७.

वा. वि. चां.


*कुसुमाञ्जली - जीवितसार.