या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ वा. ५५ कीं त्या बालकाचे नांवाने तीनच दिवस कारभार चालल्यावर तो बाल- राजा मारला गेला व त्याची गादी त्याच्या मामानें बळकाविली. त्यानें सुलतान महमदशहा आदेल या नांवानें आपली द्वाही फिरविली. हा राजा अक्षर शून्य, मनःपूतं आचरण करणारा, निर्दय, व पहिल्या प्रतीचा विषयलंपट असा होता. परंतु सुदैवेंकरून त्यास हेमू सार- ख्या मुत्सद्याची जोड मिळाली. हेमू हा हिंदू असून तो मूळचा मेवात प्रांतांतील रेवारीचा एक लहानसा दुकानदार होता. त्याने आपली अलौकिक आक्रमशक्ति व बुद्धिवैभव इतकें दाखविलें कीं बादशाहार्ने त्यास सर्व राज्यसूत्रे आपल्या एकट्याच्या हातीं आणूं दिलीं, परंतु, शेरशहाच्या राज्यांत सुरू झालेली दुफळी हेमूच्या आक्रमशक्तीस बंद करितां आली नाहीं: इब्राहिमखान यानें वियाना येथें बंड केलें व आग्रा आणि दिल्ली बळकावून सुलतान ह्मणून आपल्या नांवाची द्वाही फिरविली. सतलजच्या वायव्येकडील प्रांताचा सुभेदार अहमदखान यानें पंजाब काबीज करून शिकंदरशहा या नांवानें आपली द्वाही फिर- विली. सुजाखान यानें माळव्याचें राज्य बळकाविलें. शिवाय, पूर्वेकडील प्रांतांवर दोन प्रतिस्पर्धी सरदार आपापले हक्क सांगू लागले. नंतर ज्या झटापटी झाल्या त्यांत शिकंदरशाहा याची सरशी झाली. त्यानें आग्र्याहून २० मैलांवर फारा मुक्काम इब्राहिमखान याचा पराभव केला व दिल्लीवर जाऊन ती हस्तगत केली. नंतर तो जोनपूर व बिहार हों फिरून काबीज करण्याकरितां मोहिमेची तयारी करीत होता. इत- क्यांत काबुलाकडून आपणावर येणाऱ्या अरिष्टाची बातमी त्यास लागली. यापुढे घडलेल्या झटापटी विशेष महत्वाच्या नाहींत; पण त्यांचे परि- णाम मात्र फारच मोठे झाले. इ० सं० १९९४ च्या नर्वेबर महिन्यांत थोड्याशा सैन्यानिशीं हुमायून काबुलाहून निघाला व सिंधुनदाकडे चालला. मार्गांत त्याचे सैन्य वाढतच गेलें. या मोहिमेंत अकबर त्याच्या समा- होता. सिंधुनद ओलांडिल्यावर हुमायून रावळपिंडीकडे वळलाव