या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५६ अकबर बादशहा. तेथून तो रावी नदीच्या पलीकडे कालानारवर सरसावला. येथें त्यानें आपल्या सैन्याचे दोन भाग केले. एका टोळीवर आपला बलाढ्य सर- दार बहिरामखान याची योजना करून त्यास जाळंदर प्रांतावर पाठविलें व आपण स्वतः लाहोरावर चाल केली. तेथून त्यानें आपला विशेष प्रेमाचा सरदार अबदुलमअली यास दिपालपूर काबीज करण्याकरितां खाना केलें. दिपालपूर हैं ते वेळीं मोठें नाक्याचे ठिकाण होतें, कारण तेथून मुलतान व दिल्ली यांच्यामधील सर्व प्रांत अगर्दी अटोक्यांत ठेवितां येत होता. यापुढील गोष्टींचा घाट फारच त्वरित जमून आला. बहिरा खान यानें शिकंदर शाहाचे सरदाराचा सतलज नदीच्या तीरीं मच्छिवाडा येथें पाडाव करून सरहिंदावर स्वारी केली. त्याचा समूळ नाश करण्याच्या उमेदीनें तेथें शिकंदरशाहा आपल्या प्रचंड सैन्यासह मोठ्या त्वरेनें आला. इकडे बहिराम यानें भोंवर्ती खंदक खणून आपली छावण मजबूत केली व कुमक पाठवून द्यावी ह्मणून हुमायुनास निरोप पाठविला. त्यानें त्यासाठीं अकबरास पाठविलें व आपणही थोडके दिवसांत त्याच्या मागोमाग चाल केली. हे दाखल होण्यापूर्वीच शिकंदरशाहा तेथें जाऊन पोर्होचला होता; परंतु एकदम हल्ला करावयास त्याचा धीर होईना. यामुळे त्याचा नाश झाला. हुमायुनान दाखल होतांक्षणींच एकदम लढाई झाली त्यांत हुयायुनास पूर्ण जय मिळाला व तेणेंकरून वादाचा निकाल ही पण लागला. शिकंदरशाहा शिवालीक पहाडाकडे पळून गेला; व हुमायून विजयी सैन्यासह दिल्लीवर चाल करून गेला. तेथें तारीख २३ जुलै रोजीं आपलें ठाणे बसवून हुमायुनानें आपल्या सैन्यांतील एका टोळीस रोहिलखंड काबीज करण्या करितां दवडलें व दुसरीस आग्रा ताब्यांत घेण्यासाठी रवाना केलें. पंजाब हस्तगत करण्याकरितां अबदुलमअली यास त्यानें पूर्वीच पाठवून दिलें होतें. निकरावर प्रसंग आणिला.