या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ वा. ५७ परंतु, हुमायुनाचीं संकटें अद्यापिही संपर्ली नव्हती. महमदशहा आदेल याचा मुख्य कारभारी व पराक्रमी सरदार हेमू यानें, बंगालच्या तोतया राजाने वायव्य प्रांतांत स्वारी केली होती त्याचा यमुनेच्या कांठा- वर काल्पीजवळ पराभव करून दिल्लीवर स्वारी करण्याचा घाट घातला होता. शिकंदर शहाचा सरहिंद येथें बीमोड झाला होता, तोही पंजा- बांत चळवळीचीं चिन्हें दाखवूं लागला. ह्या अडचणींस न जुमानून हुमायुनार्ने दिल्लीतच राहण्याचा निश्चय केला. पंजाबातील बंडावा मोडून स्थिरस्थावर करण्याकरितां त्यानें अकबरास, समागमें बैराम- खान यास अताळिक अथवा मंत्री ह्मणून देऊन रवाना केलें. राजपुत्र अकबर याने काय काय केलें हें आपण अगोदर पाहिलें पाहिजे. तो शहाजादा इ० स० १९५६ च्या जानेवारी महिन्याच्या आरंभीं सरहिंद येथें दाखल झाला. हुमायुनाच्या प्रीतितला सरदार अबदुलमअली याच्या दिमाखाच्या व अरेरावीच्या वर्तनाला विटलेले बरेच सरदार राजपुत्र अकबर यास तेथे येऊन मिळाले. नंतर त्याने फिलार येथें सतलज नदी ओळांडिली व कांग्रा प्रांतांतील सुलतानपुरावर चाल केली. तेथून तो शिकंदरशहाचा पाठलाग करीत हरियाना पावेर्तो गेला. तेथे पोहचल्यावर दुसरे दिवशीं सकाळीं हुमायुनास भयंकर अपघात घडल्याची खबर येऊन पोहोंचली. या खेदजनक बातमीमुळे अकबर पुढें चाक करण्याचें तहकूब करून, कालानारकडे परत जाऊन जास्त बातमीची वाट पहावी अशा उद्देशाने निघाला. या शहराजवळ येत असतां हुमायुनाच्या हुकुमानें लिहिलेला खलिता जासुदार्ने त्याच्या हातीं दिला. त्यांत आपण लवकरच बरें होऊं अशी आशा दर्शविली होती. परंतु थोड्या वेळाने दुसरा एक जासूद आला व त्यानें बादश- हाच्या मृत्यूची खबर आणिकी. लागळींच अकबराच्या नांवाची द्वाही फिरविली गेली. वय कायतें १३ वर्षे चार महिने, अशा अल्पवयस्क मुकास या 8