या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५८ अकवर बादशहा. वेळचा प्रसंग मोठ्या कसोटीस लावणारा होता. यानें पंजाबांत तर आपलें ठाणे बसविलें होतें; व त्याच्या पदरच्या सरदारांनीं सरहिंद, दिल्ली, व कदाचित् आग्रा ही हस्तगत केलें होतें. हें खरें; तथापि अकबरास कळून आर्के होतें कीं बंगाल प्रांताच्या आणखी एक तोतया राजाचा समरांगणांत पराभव करून द्विगुणित विजयोत्साहार्ने चढलेला हेमू हा उघडपर्णे महमदशाहा आदेलचा अंमल पुनः बसविण्यासाठीं, ५०,००० लोक व ५०० हत्ती येवढ्या सैन्यासह आग्र्यावर हल्ला करण्याकरितां निघाला आहे. पुढे थोडक्याच दिवसांनंतर अकब- राच्या कार्नी आणखी एका संकटाची खबर आळी, ती ही कीं काबूल येथें आपल्या बापानें नियुक्त केलेल्या सुभेदाराने बंड केलें आहे. हुमायून हा दिल्लीच्या राजवाड्यांतील पुस्तकाळ्यावरच्या गच्चीला जाणान्या जिन्याच्या वरच्या पायरीवरून पडल्या कारणाने त्याचा अंत झाला. तो त्यानंतर चार दिवस वांचला; पण त्या काळांत बहुतेक तो बेशुद्धच होता. तारीख २४ जानेवारी रोजी सायंकाळीं त्याचें प्राणोत्क्रमण झालें. ते वेळीं त्याचें वय ४८ वर्षांचें होर्ते. राजधानींतीक अमीर उमरावांत टारडीबेगखान हा श्रेष्ठ होता व तोच खुद्द दिल्लीचा सुभेदार होता. त्यानें लागलींच तेथचा सर्व कारभार आपल्या हात घेतला. त्यानें प्रथमतः खबरदारी ही केली कीं, युवराज अल्प- वयी अकबर - यास गादी मिळण्याची व्यवस्था पक्की लागेपर्यंत बाद- शाहाच्या मृत्यूची गोष्टच त्यानें गुप्त ठेविकी व एकंदर घडलेल्या वृत्तां- ताची सविस्तर हकीकत अकबराकडे जासुदाबरोबर रवाना केली. मोठ्या करामतीचा व्यूह रचून त्यानें बादशहाच्या मृत्यूची खबर १७ दिवसपर्यंत बाहेर पडूं दिली नाहीं. नंतर तारीख १० फेब्रुवारी रोज आपल्या अमीरांसह तो मोठ्या मशीदींत गेला व बादशहाकरितां होत असळेला खुदबा त्यार्ने अकबराचे नांवानें पढविला. नंतर बादशाह वस्त्रें, शिरपेच, व जवाहीर हीं खाजगीकडील सरदार व गारदी .