या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समागमें देऊन नवीन भाग ८ वा. ५९. बादशहाकडे पंजाबात त्याचें सदर ठाणें. होतें तेथें खाना केलीं. शिवाय, हुमायुनाचा भाऊ कामरान याचा मुलगा गादीवर हक्क सांगेल असा संभव होता त्यासही त्यांचे बरोबर दिलें. इतकें झाल्यावर तो हेमूची दिल्लीवर हल्ला करण्याची जी भीति उत्पन्न झाली होती तो निवारण करण्याच्या उद्योगास लागला. भाग आठवा. बापाची गादी मिळविण्याकरितां अकबरानें केलेले युद्ध. ॥ विभैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः ॥ ॥ प्रारब्ध मुत्तम जना न परित्यजन्ति ॥ ॥ विघ्नें पुनः पुनरपी जरि आड येती । आरंभिली कृति न सजन सोडिताती ॥ आपल्या सैन्याच्या अग्रभाग कालानार शहरांत प्रवेश करीत असतां बापाच्या मरणाची खबर अकबर यास कळली हें पूर्वीच सांगितलें आहे. ते वेळीं काबूल येथें उद्भवलेल्या बंडाची बातमी त्यास समज की नव्हती; आणि हेमू कदाचित् दिल्लीवर चाल करील ही गोष्ट त्याचा मंत्री बैराम- खान याचे मनीं मानसीं ही आली नव्हती. यामुळे, प्रथमतः थोडे दिवस त्यास असें वाटलें कीं ज्याचें पारिपत्य करण्याकरितां आपणास बापाने पंजाबांत पाठविलें होतें तो शिकंदरशहाच कायतो समरांगणांत उभा असा एक शत्रु आपणास आहे. त्याने अद्यापि ही आपले शस्त्र खालीं ठेविलें नव्हतें. तो हळूहळू काश्मीरच्या बाजूला हटत चालला होता. ह्मणून पंजाब बिनधोक करून ठेवणें हें अगत्याचें आहे .व तें साधण्याकरितां शिकंदरशहाचा पाठलाग केला पाहिजे असे या बाल- ·बादशहास व त्याचा मंत्री बैराम यास वाटलें. अशा विचाराने त्यांनीं कीळानार येथून सैन्याचा तळ उठविला व शिकंदरशहावर जाऊन त्यास