या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६० अकबर बादशहा. पिटाळून लाविलें व तो शिवालिक पर्वतांच्या खालच्या ओळीस मानकोट किल्ल्यांत आश्रा धरून राहिला. हा किल्ला फार मजबूत होता; ह्मणून व हिंदुस्थानांत आणि काबुलांत अनिष्ट गोष्टी घडून आल्याची बातमी येऊन पोहचली होती त्यामुळे उभयतां सेनानायकांनीं त्या किल्ल्यास वेढा घालून नाकेबंदी करण्याकरितां पुरेसें सैन्य ठेवून तेवढ्यांतच समाधान मानिले व ते जालंदराकडे परतले. वेळ खरोखरच तशीच आणीबाणीची होती. काबुलांत बंडावा उद्भवला होता इतकेंच नव्हे तर हेमूचें सैन्य पदोपदीं वाढू लागले होतें, व एक देखील बार न काढतां आग्रा त्याचे हातीं येऊन, तेथील संरक्ष- णार्थ ठेविलें सैन्य हटत होतें त्याचा पाठलाग करीत तो दिल्लीकडे येत होता. ही बातमी समजल्यावर दुसरेच दिवशीं खबर आली कीं मोंगल सैन्याचा दिल्लीजवळ पाडाव करून हेमूनें त्या राजधानींत आपलें ठाणें बसविले असून टारडीबेग अवशिष्ट राहिलेल्या सैन्यासह सरहिंदाकडे पळून गेला आहे. 1 पुष्कळांची सल्ला ह्मणजे नेहमीं शहाणपणाचीच असते असें नाहीं. हेमूनें मिळविलेल्या जयाची बातमी आली तेव्हां अकबरानें आपल्या शूर सरदारांची सभा भरविली व त्यांस सल्ला विचारिली. ते वेळीं, एक शिवायकरून बाकीच्या सर्वांनीं त्यास काबुलाकडे जाण्याचा आग्रह केला. ती डोंगरांतील राजधानी सहजगत्या काबीज करितां येईल अशी पुरी खात्री होती व हिंदुस्थानावर पुनः स्वारी करण्यास अनुकूल प्रसंग येईपर्यंत तेथें बादशहानें दम खाऊन राहावें असा त्यांचा अभि- प्राय पडला. परंतु बैरामखान याचे मतास फारच मान. त्यास ही सल्ला मुळींच पसंत न पडून त्यानें आग्रहपूर्वक सुचविलें कीं सतलज ओलांडून ताबडतोब चाल करून टारडीबेगच्या सैन्यास जाऊन मिळावे व तेथू सर्व सैन्यासह हेमूवर हल्ला करून तुटून पडावें. तो ह्मणाला “दिल्ली- दोनदां हातीं आली व दोनदां हातची गेली; तेव्हां, हव्या त्या जोखमी