या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ८ वा. असोत, पण ती पुनः हस्तगत केलीच पाहिजे. ६१ खऱ्या महत्वाची राज- धानी दिल्ली; काबूल नाहीं. ती स्वाधीन झाल्यावर काबूल सहज मिळ- वितां येईल." अकबराची मनोदेवता ही बैराम याच्या बुद्धिवादाशीं तंतो- तंत जुळली ; व सतलज उतरून एकदम चाल करून जाण्याचा हुकूम झाला. मिळवावयाचें तर हिंदुस्थानदेशांतील सारें विस्तीर्ण राज्य; नाहीं तर काबूलचा लहान प्रांतच कायतो आपणांस राहणार, हे अकबर व बैराम यांस पूर्णपर्णे दिसून आलें होर्ते. कारण, दिल्ली येथें ठार्णे बसविल्यावर पंजाब जिंकून तो प्रांत राज्यास जोडण्याची हेमू तयारी करीत आहे हें त्यांना त्यांच्या अनुयायांकडून कळलें होतें. तेव्हां प्रसंग असा होता कीं, जो अघाडी मारील, जो प्रथमतः चाल करून जाईल त्यासच बहुतेक यशप्राप्तीची आशा होती. दबा धरून मागसला तो एशिया खंडांत बहुतेक बुडालाच ह्मणून समजावयाचें. म्हणून, आक्टोबर महिन्यांत अकबर जालंदर येथून निघाला व सतलज ओलांडून सरहिंद येथें पोर्हो- चला. येथें दिल्लीच्या तटाखाली हेमूनें पराभव केलेले अमीर उमराव वटारडीबेग हे त्यास येऊन मिळाले. ते दाखल झाल्यावर ज्या गोष्टी घडून आल्या त्यांच्यामुळे अतालिक बैरामखानाची शिरजोर स्वैरसत्ता अकबरास असह्य वाटण्यास आरंभ टाडीवेग हा तुर्की उमराव होता. हुमायुनाच्या आपल्या बंधुवर्गाबरोबर ज्या झटा- पटी झाल्या त्यांत प्रथमतः टारडीबेग हा कधीं कधीं हुमायुनाचा पक्ष स्वीकारी व कधीं कधीं त्याच्या भावांस जाऊन मिळे. परंतु अखेरीस त्यानें अकबराच्या बापाचाच पक्ष पत्करिला. हुमायुनाच्या मृत्यूनंतर कामरानाचा मुलगा दिल्लीस असतां रक्तपात होऊ न देतां अकबराची गादी कायम ठेविली हे त्याच्याच निःसीम राजनिष्ठेचें व चातुर्याचेंच फळ होतें. हेमूनें त्याचा पराभव केला तेव्हां दिल्ली सोडून देण्यांत त्याने फार घाई केली, असा कित्येक सरदारांचा त्यावर आक्षेप झाला.