या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२ अकबर बादशहा. होता. ही गोष्ट खरी जरी असली तरी ती फक्त चूक होती. सेनानी व्यूहरचनेंत चुकला ह्मणून कांहीं गुन्हेगार होत नाहीं. शिवाय, मोठें सैन्य जमा करून त्यानें सरहिंद येथें बलवत्तर कुमक तरी अकब- रास आणिली होती. परंतु बैरामखान व टारडीबेग यांच्यामध्ये पूर्वी- पासूनच मत्सरभाव होता. महमुदीय धर्मांत शिया व सुन्नी असे दो पंथ आहेत; पैर्की, बैरामखान हा शिया होता व टारडीबेग हा सुन्नी सांप्रदायाचा होता. या पंथभेदामुळें बैरामचे अंतःकरणांतील वैराग्नि अधिक भडकला. टारडीबेग सरहिंद येथें पोहोंचल्यावर त्यास आपल्या तंबूत बैरामानें बोलावून मारेकऱ्यांच्या हाती त्याचा वध कर- विला. या अघोर कृत्यानें अकबराची मर्जी फारच नाराज झाली. राम यास आपला माथा उजळ करितां आला नाहीं. सैन्यांत शिस्त राखण्याकरितां हाताखालील अमीर उमराव यांना आपल्या पायरी- प्रमाणे ठेवणें हें अवश्य व त्यासाठी असलें घोर कर्म करणें जरूर होतें, असेंच कायतें त्यानें आपल्या कृतीचें मंडन केलें असावें असें मान- ण्यास हरकत नाहीं. इकडे, राजा हा किताब धारण करून हेमू दिल्ली येथें मोठ्या आनं- दांत असून सैन्य जमविण्याच्या खटपटीस लागला होता. अकबर सरहिंद येथें दाखल झाल्याची खबर त्यास समजली तेव्हां त्यानें आपला तोफखाना दिल्लीचे उत्तरेस ५३ मैलांवर पानिपत शहर आहे तेथें ताब- डतोब रवाना केला व मागाहून घोडेस्वार व पायदळ यांच्या समागमें आपण जाण्याचा विचार केला. पण इकडे अकबर ही सरहिंदाहून त्याच ठिकाणाकडे येत होता; इतकेंच नाहीं, तर त्याने दूरवर नजर देऊन अघाडीस आपका सरदार अल्लीकुली खान ई शैबानी यास १०,००० घोडेस्वारानिर्शी अगोदरच तिकडे रवाना केलें होतें. हेमू व टारग यांच्यांत दिल्ली येथे जी कढाई झाली तींत हा सरदार होता व टारडीबेग याने विनाकारण उतावळी करून पळ काढिला, असा याचाही मोठा