या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ८ वा. ६३ आक्षेप होता. अल्लीकुली खान ई शैबानी हा घोडा फेकीत पानिपत येथें पोर्होचला; व हेमूचा फक्त तोफखानाच कायतो तेथें आहे असें पाहून त्यानें त्यावर एकदम हल्ला करून सर्व तोफा हस्तगत करून घेतल्या. ही जी त्यानें अलौकिक युद्ध-चातुर्याची कडी केली त्याबद्दल त्यास खानझमा पदवी मिळाली. व याच नांवानें तो इतिहासांत प्रसिद्ध आहे. या दुर्दैवाच्या घाल्यानें हेमू अतिशयित खिन्न झाला; कारण त्यानें या तोफा तुर्कस्थानांतून आणिल्या होत्या व सैन्यांत त्यांना फार पूज्य गणीत. तथापि विलंब न लावितां तो पानिपताकडेस एकदम जाण्यास निघाला. तारीख ५ नवेंबर १९५६ रोजी सकाळी अकबर व बैराम हे पानि- पताच्या मैदानाकडे येत असतां हेमूचें सैन्य आपणाकडेच येत आहे अर्से त्यांनीं पाहिलें. बरोबर तीस वर्षांपूर्वी आपला आजा बाबर यानें याच समरांगणावर कोदी घराण्याचा पाडाव करून हिंदुस्थानची बाद- शाही संपादन केली, हा विचार यावेळीं अकबराचे मनांत आल्यावांचून राहिला नसेल असें आह्मांस वाटतें. ज्या शूर घराण्यानें त्याच्या बापास हिंदुस्थानच्या हद्दपार केलें होतें त्याच्याच नातलगाचे सैन्याश आतां अकबराचा सामना व्हावयाचा होता. होणाऱ्या लढाईवर हिंदु- स्थानच्या बादशाहीचा निकाल कायमचा व्हावयाचा होता है त्यास ठाऊक होतें. अकबर भविष्यज्ञानी होता खरा; परंतु जें घराणें हिंदुस्थानांत दोनशे वर्षांहून अधिक कालपर्यंत राजसत्ता चालवील अशा घराण्याची दिल्लीच्या तक्तावर प्रथम स्थापना करण्यास ही लढाई साधनीभूत होईल असे भविष्य त्यास कळलें नसावें. तसेच, उत्तरे- कडून पुनः स्त्रारी होऊन पानिपत येर्थे पुनः एक निकराचा व निकाल लावणारा संग्राम होईल तेव्हां या घराण्याचा -हास होईल व अटलांटिक महासागरांतील एका बेटांत राहणाऱ्या परकीय लोकांचें आगमन होईल तेव्हांच त्याचा समूळ नाश होईल हे त्याच्या कल्पनेंत ही आले नसेल. ● हेमूनें आपल्या सैन्याचे तीन भाग केले होते. अग्रभाग त्याचे