या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४ 1 अकबर बादशहा. ५०० हत्ती होते. प्रत्येकावर एक एक मोठा सरदार होता. आपल्या आवडत्या हत्तीवर स्वतः स्वार होऊन हेमू हा त्यांच्या अग्रभाग होता. मोंगल सैन्याची डावीकडील तुकडी पुढे सरसावत होती तीवर त्याने एकदम हल्ला करून तिची दाणादाण केली; परंतु या समयीं त्याच्या हाताखालील सरदारांनीं पायदळाची कुमक ऐन वेळेस न पोहचविल्या- मुळे तो मार्गे सरला व शत्रूच्या मधल्या तुकडीवर जाऊन पडला. ही तुकडी बैरामखानाचे हुकमतीखालीं होती.. त्या धूर्त व चतुर सेना- पतीच्या लक्षांत अशा प्रकारें शत्रूकडून मारा होईल ही गोष्ट केव्हांच येऊन चुकली होती; ह्मणून त्यानें आपल्या तिरंदाज लोकांस हत्तींवर शरसंधानाचा वर्षाव करण्यास फरमाविलें होतें. ह्यांपैकीं एक बाण हेमूच्या डोळ्यांत शिरला व त्या योगानें तो हौद्यांत क्षणमात्र बेशुद्ध होऊन पडला. आपला सेनानायक पडला हें पाहून त्याचे सैन्याचें एकदम धैर्य खचलें. पुढें हल्ल्याचा जोर कमी कमी होत जाऊन थोडक्याच वेळांत तो अगर्दी बंद झाला. बैरामाच्या वीरांनी हल्ला थांबतांच चाल करून शत्रूंच्या सैन्याची दाणादाण करून टाकिली. हेमू ज्या हत्ती- वर होता त्यावरील महात मरण पावला आणि तो हत्ती स्वैरपर्णे फिरूं लागला. त्यानें सहजगतीच अरण्याची वाट धरली. हें बैरामचा दूरचा आप्त व अनुयायी शहाकूली महाम इ बहारलू यानें पाहून त्या हत्तीचा पाठलाग केला. तेवेळीं हौद्यांत कोण आहे हे त्यास माहीत नव्हतें. त्यानें त्या हत्तीजवळ जाऊन त्याच्या मानेवरील दोरी पकडली तेव्हां त्यास समजलें कीं आपण ज्यास कैदी केलें तो घायाळ झालेला हेमू होय. त्यानें त्यास बैरामा- कडेस नेलें व बैराम त्यास राजपुत्र अकबराकडेस घेऊनं गेला. त्यादिवशीं अकबराने सर्व दिवसभर अपूर्व मर्दुमकी व युद्धकौशल्य प्रदर्शित केलें होतें, तथापि लढाईची सर्व व्यवस्था त्याने आपल्या अतालिकाकडेच सोपविली होती. यापुढील प्रवेशाचे वर्णन तत्कालीन एका ग्रंथकाराने अर्से केर्ले ‘आहे :–त्या घायाळ झालेल्या सेनानायकांस आपल्या धन्यापुढें