या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ८ वा. ६५ करून बैराम म्हणाला 66 हा आपला पहिला संग्राम आहे. ह्या हराम- खोर नास्तिकावर आपल्या तलवारीची परीक्षा पहा; हे आपले कृत्य फार पुण्यकारक होईल." यावर अकबरानें उत्तर दिलें “तो आतां केवळ मृतवत् आहे, तेव्हां त्यावर अशा वेळीं मी प्रहार कसा करूं ! त्याला शुद्धि व शक्ति असती तर त्यावर मीं आपर्के शस्त्र कसास लाविलें असतें.” याप्रमाणे अकबराने इनकार केला तेव्हां बैरामानें त्या बंदिवान केलेल्या हेमूस आपल्या हाताने कापून टाकिलें. शत्रूंस विसावा न देतां त्यांचा दिल्लीकडे पाठलाग करण्याकरितां बैरामार्ने घोडेस्वार ताबडतोब खाना केले; व दुसरे दिवशीं, मुक्काम न करितां, ५३ मैलांची मजल मारून मोंगलांच्या सैन्यानें दिल्लीत प्रवेश केला. यापुढे हिंदुस्थानदेशांत अकबरास एक ही भय मानण्यासारखा प्रतिस्पर्धी राहिला नाहीं. तीस वर्षांपूर्वी त्याच्या आजानें जें स्थान प्राप्त करून घेतलें होतें त्याच स्थानास अकबर आज पोहचला. त्याच्या बापाने व आजानें सोन्यासारखी आलेली संधि दवडविली. त्याप्रमाणेच हा अल्पवयी राजपुत्र करितो कीं काय हे आतां पहावयाचें होतें. त्याच्यापुढे किती जिकीरीचें व महत्वाचे काम होतें यार्चे यथातथ्य स्वरूप स्पष्टपणे कळण्याकरितां अकबर गादीवर बसला ते वेळीं हिंदुस्थानची स्थिति कशी होती याची पूर्ण माहिती पाहिजे. ती आपण पुढील भागांत सादर करूं. व त्याचे पुढील भागांत बैरामखानाच्या शिक्षेनें या चौदा वर्षीच्या नृपतनयाचे कितपत हित होण्याजोगें होतें याचें विवेचन करूं.