या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

० भाग ९ वा. ६७ स्वतंत्रपर्णे राज्य करीत होता. हुमायुनाने या राज्यावर स्वारी करून आपली सत्ता बसवली होती खरी; परंतु त्यानें हिंदुस्थानांतून पळ काढ- ल्यावर या राजानें आपकी स्वतंत्रता पुनः स्थापित केली; व ती हा काल- पर्यंत अबाधित राहिली होती. या राजानें आपल्या अगर्दी शेजारच्या माळव्याच्या राजार्शी लढाई चालविली होती व तींत त्यास अनेक वेळां जय ही मिळाले. माळव्याचे राज्य ही त्यांत हल्लीं आपण ज्यास मध्य- हिंदुस्थान ह्मणत त्याचा समावेश होत असे - अकबर गादीवर बसलां ते वेळीं स्वतंत्र होतें. याप्रमाणें खानदेश व राजपुतान्यांतील संस्थानें ही स्वतंत्र होतीं. ह्या राजपुतान्यांतील संस्थानांची योग्यता विशेष होती. · व त्यांबद्दल विशेष माहिती देणें युक्त आहे. विख्यात राणा संग याचे पराक्रमाचा उल्लेख प्रसंगवशात पहिल्या भागांत झालाच आहे. बाबराने या राजाचा पराभव केल्यामुळे मेवा- डच्या सत्तेस मोठा धक्का बसला; आणि शीरशहानें जेव्हां हुमायुनास हिंदुस्थानांतून हांकून लाविलें, तेव्हां तेथील राजांस दिल्लीच्या बादशहाचें प्रभुत्व मान्य करावें लागलें. परंतु शीरशहा मरणपावल्यानंतर जी धामधूम उडाली तींत त्यांनी नष्ट झालेली स्वतंत्रता पुनः मिळविली; व अकबर राज्यारूढ झाला त्यावेळीं मेवाडचें राज्य राजपुतान्यांत प्रमुख व मान्य असें होतें. तेथील बाकीच्या संस्थानिकांपैकीं जयपुरचें राज्य बाबराचे वेळीं मोंगलांचें मांडलिक झालें होतें. त्या वेळचा राजा बहारमा यानें बाबरास सैन्याची कुमक केली होती ; व शीरशहानें पराजय करण्या- पूर्वी हुमायुनानें त्यास अंबरचा राजा ही मोठी पदवी दिली होती. अकबर पानिपत येथे विजयी झाला तेव्हां बहारमाचा मुलगा भगवान - दास हा गादीवर होता. यावेळीं जयपुरापेक्षां जोधपूरचें महात्म्य मोठें होते. तेथील राजा मलेदवसिंग याच्या इतका शिरशाहाशीं रणांगणांत कोणीच टिकला नव्हता. परंतु, पराभव झालेला हुमायून इकडे तिकडे पळत सुटला तेव्हां या राजाने त्यास आश्रा • दिला नव्हता. अकबर