या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८ अकबर बादशहा. दिल्लीच्या तक्तावर बसला त्यावेळी हा राजा हयात असून स्वतंत्र व रजपूत राजांत सर्वाहून प्रबळ असा होता. जैसलमेर, बिकानेर व रणाच्या कांठावरील संस्थाने ही ही स्वतंत्रच होतीं. राजपुतान्यांतील इतर लहान कहान संस्थानें तसेंच सिंध देश व मुलतान ही देखील स्वतंत्रच होतीं. शिवाय, मेवात व भागळखंड यांवर परकीयांचा अंमल मुळींच नव्हता; परंतु ग्वालेर, ओरछा, चंदेरी, नरवार आणि पानेवो हीं संस्थानें आग्र्याच्या शेजारी असल्यामुळे त्यांस वारंवार घस खावी लागे व तेथील मुसलमान राजांस त्यांवर आपला अंमल स्थापण्यास ज्या मानानें कमी अधिक फुरसत सांपडे त्या मानानें हीं संस्थाने ही त्यांची कमी अधीक मांडलिक बनत असत. परंतु, ज्या प्रांतांत मुसलमानी राजसत्ता स्थापित झाली होती त्यांत देखील एकमेकांत संगति ह्मणून नव्हती. निरनिराळ्या प्रांतांवरील अधिकार ज्या निरनिराळ्या अमीर उमरावांच्या स्वाधीन होता ते अंतर्गत व्यवस्थॆत बहुतेक स्वतंत्र होते; दिल्लीच्या तक्तावर जो मुख्य राजा, सुल- तान, किंवा बादशहा असे, त्यास ते आपला मुख्य समजत हें खरें; तथापि त्याची निष्कंटक सत्ता त्याचे खुद्द दरबारांतच. लढाईचे प्रसंग मुख्य सेनाधिपत्य त्याकडेसच असे. परंतु, आपल्या अमीर उमरावांच्या हाताखालील प्रांतांतील कारभारांत तो हात घालीत नसे. हे प्रांत आपआपल्या सुभेदारांच्या अमलाखालीं, नांवानें नाहीं, तरी वस्तुतः स्वतंत्र होते. या मुसलमानी राज्यांतील हिंदु प्रजा, ह्मणजे त्यांतील सात - अष्टमांश प्रजा संतुष्ट स्थितींत असे अर्से बहुतेक इतिहासकारांचें मत आहे. आपल्या सत्तेखालील सर्व परधर्मी प्रजेवर मुसलमान राजे जिझिया नांवाचा कर प्रत्येक माणसावर बसवीत तो हिंदुप्रजेवरही बसविला होता खरा; परंतु त्यांस धर्मसंबंधीं आचरणांत पूर्ण स्वतंत्रता असे. भाराच्या प्रत्येक खात्यांत हिंदु लोकांचेंच प्राबल्य होतें. बहुतेक प्रांतांत राज्यकार-