या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

0 भाग ९ वा. ६९ हिंदु-जातींपैकीं वरिष्ट जातींतील लोकांनीं सुभेदारांच्या खालोखाल आपला अधिकार पिढ्यानपिढ्या कायम ठेविला होता, व लढाईच्या प्रसंगीं ते आपल्या ऐपतीच्या प्रमाणानें बादशाही सेनेस फौजफाट्याची मदत करीत असत. याप्रमार्णे दरएक प्रांतांत सुभेदारास जरूर लागेल तेव्हां त्याच्या परंतु, याशिवाय, या स्थानिक तैनातीस हजर अशी स्थानिक सेना असे. सेनेहून अगदीं निराळे असें कांहीं तरी नियमित बादशाही कष्कर प्रत्येक प्रांतांत बहुतेक असेच. या लष्कराचा तनखा बादशाही तिजो- रींतून दिला जाई, व या सेनेच्या अधिपतीची निवडणूक होत असे. प्रांतिक सुभेदाराची सत्ता या अधिकाऱ्यावर बहुतेक चालत नसे, कारण तो प्रत्यक्ष बादशहालाच जबाबदार असे. ज्या सिद्धांतांवर व तत्वांवर न्याय-पद्धति रचली होती त्यांकडेसच नजर दिली तर ती सर्वोत्कृष्ट असे. कारण, राज्य हैं कायद्यावर अवलं- बून असर्ते ह्या मुसलमानी तत्वास अनुसरूनच न्याय निवाडा होत असे. न्यायाचे काम कांजी हे कायद्यास अनुसरून करीत. तो कायदा ह्मणजे कुराणाच्या आधारें पण देशाच्या चाली वहिवाटीप्रमाणें फेरफार करून केलेल्या निवाड्यांचा एक संग्रह होता. दिवाणीकडील हरएक प्रकारचीं, किंबहुना, ज्यांत राज्याच्या सुरक्षितपणाचा संबंध नाहीं सर्व कार्मे काजकडेस र्सोपविलीं असत. परंतु फौजदारीचें काम मात्र त्यांच्या- कडे नसे. ह्या कामाकरितां बादशहा स्वतंत्र कामगारांची योजना करी. या कामगारांची काम करण्याची पद्धत व्यवहारदृष्ट्या अनियं- त्रित अशी होती; व त्यांस बादशहार्ने नेभिल्यामुळे व त्याचें पाठवळही त्यांस असल्यामुळे ते कर्धीकधीं काजीच्या अधिकारांतही हात घालीत. यावेळीं प्रजाजनांत संतोष व समाधानवृत्ति साधारणतः चोहोंकडे नांदत होती; यावरून न्यायाचें काम एकंदरींत समाधानकारक अशा रीतीनें चाळविलें जाई, अर्से अनुमान केल्यास चुकीचें होणार नाहीं. हिंदु-