या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७० अकबर बादशहा. स्थानांत येऊन राहिलेल्या प्राचीन परदेशस्थ मुसलमानी घराण्यांचें व हिंदु घराण्यांचें हिताहित कालांतराने एकच बनून गेलें होतें; व शक्य असेल तितकी दाद आपणांस न्यायाधीशांकडूनच मिळेल अशी उभय- तांची ही मनःप्रवृत्ति झाली होती. तेव्हां लढाया वारंवार होत असत; तरी देखील, पूर्वीच सरकारी दफ्तरें खरी मानलीं तर, देशाची स्थिति निःसंशय फार भरभराटीचीच होती. ज्या बादशहाच्या कारकीर्दीचें आपण निरूपण करणार आहों ती- विषयीं विचार करितांना एक महत्वाची गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे; ती ही की, पूर्वीच्या अफगाण राजांनी जी राज्यकारभाराची पद्धत घालून दिली होती तींत बाबर अगर हुमायून यांनी विशेष ह्मणण्या- सारखा फेरफार केला नव्हता. बाबर ह्यास तर ह्यापेक्षां ही अधिक अनि- यंत्रित राजसत्तेची बरीच संवय झाली होती. फरघणा, समरकंद, अथवा काबूल या ठिकाणचे राज्य करीत असतां बाबर स्वतःचें राजधा- नींत तर आपले स्वामित्व चालवीच. परंतु या शिवाय त्याच्या हाता- खाकीक सुभेदारांवरही त्याचा फार वचक असे. या सुभेदारांची व जहागीरदारांची सत्ता आपआपल्या प्रांतांत, जिल्ह्यांत, व जहागिरीत अनियंत्रित असे खरी; परंतु, बादशहाला वाटेल त्यावेळेस त्यांना दूर करण्याचा अधिकार असल्यामुळे त्यांना एक तर आपला कारभार नीतीनें व न्यायाने चालविणे भाग पडे, किंवा बादशहाच्या मर्जीचा रोख आपलेविषय कसा आहे यावर नजर ठेवण्याकरितां आपल्या तर्फे दरबारांत वकील ठेवावा लागे. तसेंच, लष्करांत बादशहाच्या खासगत तैनातींतल्या लोकांचीच भरती असे. त्यांत सरदार मंडळी व जहागीरदार यांच्या परिवारांची भर पडून शिवाय, काबीज केलेल्या प्रांतांतील लोकांचाही तींत समावेश होई. बाबर व त्याचा मुलगा हुमायून या उभयतांची राज्यपद्धति अनि- यंत्रित व स्वैर-सत्तेची होती. प्रजेला विशेष हक्क नसून प्रजासत्तात्मक •