या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ९ वा. ७१ ० संस्था तर केवळ अश्रुतपूर्व होत्या. एका राजानें केलेले कायदे कानू मागाहून येणाऱ्या राजाला रद्द करून टाकितां येत असत. सर्व कार- भारांत मी करीन ती पूर्व दिशा या न्यायानें चोहोंकडे राजाचें व्यक्ति- महात्म्य नांदत असे. बादशहाच्या स्वैरेच्छेवर दाब कायतो एकच. ' तो कसला, तर बंड होऊन आपण पदच्युत होऊं या भीतीचा. गादीवर असलेला राजा जर कां हिंमतबाज व पराक्रमी असला तर बंड होऊन तें यशस्वी होण्याचा बहुतेक संभव नव्हता. पराक्रमी व न्यायी राजांस समजत असे कीं आपण निःपक्षपातानें न्याय दिला तर आपके विरुद्ध लोक सहसा उठावयाचे नाहींत. स्वतःस परिचित असलेल्या उत्तरेकडील अफगाण प्रदेशांत वहिवाटीत असलेल्या राज्यपद्धतीहून हिंदुस्थानांतीक जिंकिलेल्या प्रांतांतील राज्य- पद्धति भिन्न नाहीं हें बाबर यास तेव्हांच समजून आलें. त्यांत फेरफार करण्याचा विचार त्याच्या मनांत आला असला तरी तो घडवून आण- ण्यास त्याला अवकाश मिळाला नाहीं. त्याच्यानंतर गादीवर आलेला मनांत योजिलें होतें ती त्याचा मुलगा हुमायून याचा तर असल्या गोष्टीकडे कल नसून त्यास तिकडे लक्ष देण्यास वेळही सांपडला नाहीं. आपल्या मरणापूर्वी थोडे दिवस जी राज्यव्यवस्था सुरू करण्याचें हुमायुनानें हिंदुस्थानांतीक पूर्वीच्या राज्यपद्धतीपेक्षां चढत्या माननीय तत्वांवर बसविलेली अशी नव्हती. पायरीची किंवा विशेष एकंदर राष्ट्राचे मोठे सहा भाग करून त्यांची राजधानी अथवा सदरची जागा दिल्ली, आमा, कनोज, जोनपूर, मांडू, आणि लाहोर येथें स्थापित करावी असा त्याचा हेतु होता. या प्रत्येक ठिकाण प्रचंड लष्करी ठाणे बसवून त्यावर विश्वासू व खात्रीलायक अशा सेनापतीस नेमून त्यांकडे प्रांतांत सर्व अधिकार सोपविण्याचा त्याचा विचार होता. हीं लष्करें इतकीं बलाढ्य व प्रचंड राखावयाचीं होतीं कीं, कसलाही प्रसंग आला तरी त्या प्रांतास 'बाहेरील कुमकेची जरूर लागू नये. एकंदर बादशाहत एकराष्ट्रत्व व