या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७२ अकबर बादशहा. सुसंगता ठेवावयाची ती बादशहाने समागमें १२००० सेना घेऊन प्रत्येक प्रांतांत आळीपाळीने जाऊन तेथील स्थानिक सैन्याची व एकंदर कारभाराची तपासणी करून. ही व्यवस्था दोषांनी पूर्णपर्णे भरली होती हे उघडच आहे. सेनापतीपेक्षां बादशहा जास्त काबीक व दक्ष असला तरी देखील ही पद्धति वाईटच. परंतु बादशहा का कमकुवत व कमी कावेबाज असला तर एका वर्षांतच तिचा फन्ना उडावयाचा. हुमायुनाच्या आकस्मिक मृत्यूमुळे वर निर्दिष्ट केलेली व्यवस्था नागच्या- जागींच राहिली. नंतर जो संग्रामास प्रारंभ झाला तो पानिप- तच्या लढाईपर्यंत तसाच चालला. बरोबर तीस वर्षांपूर्वी, आजा बाबर यानें में पद मिळविलें होतें, तेंच या लढाईच्या योगानें अकबरास प्राप्त झार्के. पूर्वी पानिपतनें बाबरास वायव्येकडील प्रांत, बिहार आणि मध्य हिंदुस्थान जिंकण्यास संधि दिली व ती त्याने साधून घेतली होती. अशीच संधि · पानिपतच्या दुसऱ्या लढाईनें अकबरास आणून दिली. या रणांत ज्याचा अकबरानें पराभव केला तो हेमूच कायतो त्याजबरो- बर सामना करण्यास योग्य असा हिंदुस्थानांत एक योद्धा होता. तेव्हां त्यापुढें जें युद्ध जिंकण्यार्चे काम होतें तें सोर्पेच होते. परंतु मिळविलेले राज्य चिरस्थायी करणे, काबीज केलेल्या निरनिराळ्या प्रांतांचे व जिंकि- केल्या निरनिराळ्या जातीच्या लोकांचें सम्मीलन व एकीकरण करणें, व बादशाही अंमल व स्वामित्व प्रांतोप्रांतीं व शहरोंशहरी भेदून चोहों- कडील राज्यव्यवस्थेत खिळून स्पष्ट रीतीनें दृष्टोत्पत्तीस येईल असे, पण परंपरागत चालत आलेल्या स्थानिक दंतकथा, चाळी, व आचारविचार ह्यांचा नाश न होईल असें एक छात्रत्व स्थापन करून वहिवा आणणें, – ह्या गोष्टी साधण्याचे कामास अकबराच्या आजार्ने हातच त्याच्या बापाच्या मनांत या गोष्टी आल्या असत्या लाविला नव्हता. किंवा त्याला कोणी सांगितल्या असत्या तर त्यास त्या असंभवनीयच वाटल्या असत्या. तथापि, त्यांच्या राज्यव्यवस्थेत अशा प्रकारचें एक-