या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर बादशहा.
भाग पहिला.

उपोद्घात.

ज्या थोर बादशहाने हिंदुस्थानांत मोंगळ घराण्याची स्थापना दृढ पायावर केळी, त्याचें हें लहानसें चरित्र आह्नीं कोणत्या नमुन्यावर लिहिलें आहे व त्यांतील विषयरचना कशी आहे, याचा थोडक्यांत खुलासा करण्याकरितां दोन शब्द लिहितों, त्याची वाचकांनीं क्षमा करावी.
 अशा प्रकारचें चिरस्थायी राष्ट्र स्थापन करण्याची मूळ कल्पना अक- बराची नव्हे. अकबराचा आजा बाबर यानें हिंदुस्थानचा मोठा भाग सर केला होता. पण त्यानंतर पांच वर्षांनींच त्याचा अंत झाला; व तेवढ्या अवकाशांत मुत्सद्दीपणाची कर्तबगारी दाखवून राज्यांत व्यवस्था करण्यास त्याला फारशी संधि सांपडली नाहीं. त्यानें समरांगणांत पाडाव केलेले प्रतिस्पर्धी राजे व त्याचे हिंदु प्रजाजन हे बाबराला केवळ विजयी योद्धा ह्या पेक्षां ज्यास्त कांहीं लेखीत नसत. तो अलौकिक बुद्धिसामर्थ्याचा होता. त्याच्या आयुष्याचा बहुतेक काळ लढाया करण्यांतच गेला. साहसाच्या जोरावर स्त्रोन्नति करणाऱ्यांपैकीं तो एक होता; पण त्याचे साहसांस असें यश मिळे कीं त्यानें लोकांचे डोळे दिपून जात. त्याची बुद्धि अचाट होती आणि त्याच्या कल्पनाशक्तीची भरारी तत्कालीन चीरांच्यापेक्षां फार उंच जात असे. विपत्काळाच्या राकट तालमींतून तो कसून बाहेर पडला होता.काबूलच्या दुर्गावरून सुपीक हिंदुस्थानांतीक