या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ९ वा. ७३ पानिपतची लढाई दिवशीं हुमायुनाचें छात्रत्व नव्हतें ह्मणूनच सन १९२६ सालीं होऊन एकच अपजय मिळाल्याबरोबर दुसरेच सर्व विस्तृत राष्ट्र लयास गेलें. आणि असें घडणें साहजिकच होतें. त्या राज्यवृक्षाचीं पाळेमुळे खोलवर रुझली नव्हतीं. तें फक्त फौजेच्या जयावर व तलवारीच्या जोरावर अवलंबून होते. एक- ही अपजय झाला तरी ते टिकण्याचा संभव नव्हता. विपत्तिरूपवायूनें तो वृक्ष समूळ उपटावयाचाच. गिझनी, घोरची, खिलजी, व तघळख यांची राज्ये अगोदर होऊन गेलीं होतीं त्यांचेपेक्षां मोंगलांचे राज्यांत- अणुरेणू इतकी देखील अधिक स्थिरता अद्यापि आली नव्हती. येवढें बस कीं बाबरानें स्थापिलेलें राज्य त्याच्यामागें हुमायुनाच्या कारकीर्दीत शीरशहाची स्वारी होतांच एकाच अपजयानें बोलतां बोलतां नष्ट झालें. हें कबूल केलें पाहिजे कीं, बाबर जर जास्त दिवस वांचला असता तर त्यानें शीरशहाचा पराभव करून त्यास मार्गे हांकून काविलें असतें. परंतु, यावरून आमचें वरील विधानच सिद्ध होतें. ० योद्धा होता. त्याप्रमाणेच शीरशहाही होता. बुद्धीचा, चंचल, व व्यवहारशून्य असा होता. बाबर हा महापराक्रमी हुमायून अव्यवस्थित युद्धकर्लेत तर त्याची गती सुमाराचीच होती. ज्या शीरशहानें हुमायुनास जिंकिलें त्यास बाबरार्ने जेरीस आणिलें असतें हें संभवनीय आहे. तथापि यावरून सिद्ध हेंच होतें कीं, आजन्म जी राज्यपद्धति बाबराच्या अंगवळणी पडली होती व जिचे योगें फरघणा व समरकंद हे एकवार त्यास मिळाले व एकबार त्याचे हातचे गेले व जिच्याच योगानें त्यास पुढे काबूलं प्राप्त झाले व हिंदुस्थान हस्तगत करून घेतां आलें तीच, ह्मणजे लढाईच्या जोरावर राज्य मिळविण्याची व " बळी तो कान पिळी " ह्या न्यायाची पद्धति त्यानें हिंदुस्थानांत सुरू केली. ज्याच्या मणगटांत जोर त्यानें वागवावे राज्यदोर' अशी ही त्या वेळची राज्यपद्धति होती. फरघणा, 6 समरकंद, काबूल, पंजाब व हिंदुस्थान यांपैकी कोणत्याही ठिकाण 10