या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४ अकबर बादशहा. बाबरच्या राज्यवृक्षाचीं पाळेंमुळे खोलवर रुझलीं नव्हतीं. वस्तुतः असे होणें शक्यच नव्हतें. राज्यपद्धतींत नव्हतीं. कारण चिरस्थायी राज्याचीं मूलतत्वेंच त्या तेव्हां त्यांची वाढ कोठून होणार ? आतां, इ०स० १५५६ च्या अखेरीस, कमाविलेलें व गमाविलेलें असें तें हिंदुस्थानचें राज्य पुनः एकदां कमाविलें जाऊन तें एका मुलाच्या हातीं आळें होतें. ह्या मुलाच्या वयास नुक्तींच १४ वर्षे पुरी होऊन एकच महिना झाला होता; व तो विपत्तींत व संकटांत वाढला होता. पानिप- तय्या लढाईनें हिंदुस्थानदेश त्यास प्राप्त झाला तेव्हां तो वयाने लहान होता तरी त्याच्या नजरेखालून बराच राज्यकारभार गेला होता. त्याचा बाप हुमायून हा त्याची नेहमीं सल्ला घेई. त्या काळचा अद्वितीय योद्धा बैरामखान याच्या हाताखालीं त्यास लष्करी विद्येचें शिक्षण प्रत्यक्ष समरांगणांत मिळाले होते. पंजाब प्रांताचा राज्यकारभार तर त्यानें सहा महिन्यांवर स्वतः चाळविला होता. पण आतां राज्यकारभार चालवि- णारा व जिंकणारा ह्या दोन्ही नात्यांनीं त्याची कसोटी लागावयाची होती. या दोन्ही बाबतींत त्यास आपल्या बापाचें उदाहरण व बैरामार्चे शिक्षण हीँ उपयोगीं येण्याचा संभव नव्हता. पानिपतचे कढाई पर्यंतच्या त्याच्या आयुष्यक्रमावरून, त्याचे अंगी अंतःकरणाची दयार्द्रता व संकटसमयींची समयसूचकता ह्या गुणांचे अंकुर आहेत हें तर दिसून आलें होतें. शरण झालेल्या हेमूस ठार मारण्याचें त्यानें नाकारिलें हें आपण नुक्तेच पाहिले आहे. पण इतउत्तर जी कामगिरी त्याजकडे आली तिच्या- करितां यांहून दुसरे अनेक गुण हवे होते. आतां सदरहू कामास लाग- णाऱ्या या गुणांची त्यास कितपत अनुकूलता होती हैं आपणास पुढें घडून आलेल्या गोष्टींवरून ताडितां येईल.