या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग दहावा. बैरामचें अकबरास शिक्षण. ॥ वितरति गुरुः प्राज्ञे विद्यां यथैव तथा जडे ॥ ॥ नच खलु तयो ज्ञने शक्ति करो त्यपहंति वा ॥ ॥ भवति च पुनर्भूया न्भेदः फलंप्रति तद्यथा ॥ ॥ प्रभवति यथा विवोद्ग्राहे मणि र्न मृदां च यः ॥ ॥ गुरू विद्या प्राज्ञा तशिच मतिमंदा हि वितरी ॥ ॥ तयांची धीशक्ती अधिक अथवा न्यून न करी ॥ ॥ घढे तच्छिक्षेचें फळ तायें बहू भेद दिसतो ॥ ॥ असे विबग्राहीँ प्रबल मणि मृल्लोष्ट नसतो | त्याचा प्रथम आपण अकबराच्या बाह्यस्वरूपाचें वर्णन करूं. मुलगा जहानगीर बादशहा यानें लिहिलें आहे कीं त्याचा बांधा मध्यम, किंबहुना उंचच असा होता. त्याचा वर्ण गव्हासारखा असून साधारण काळ्यांतच जमा करण्यासारखा होता. त्याचे डोळे व भिवया काळ्याभोर होत्या. त्याचें शरीर दणगट व जोमदार होतें. त्याचें कपाळ विशाल होतें ; छाती रुंद व बाहू लांब होते. त्याच्या नाकाच्या डाव्या बाजूबर लहान वाटाण्यायेवढा मांसक चामखीळ होता तो अति सुंदर दिसे. सामुद्रिकांचे मतें हा चामखीळ अपार संपत्ति व वाढतें वैभव ह्यांचा निदर्शक असून तो मोठें सौभाग्यलक्षण होता. अकबराचा आवाज फार मोठा व खणखणीत होता. त्याचें भाषण रसाळ व मनोहर असें होर्ते. त्याची वागणूक व रीतभात इतरांच्याहून भिन्न होती. त्याच्या चेहऱ्यावर ईश्वरी प्रौढी दिसे. ह्या वर्णनांतील मुख्य मुद्याच्या गोष्टी इतर इतिहासकारांच्या वर्णनाशीं जुळतात. एलफिस्टन साहेबानें अकबराचें वर्णन केलें आहे कीं, त्याचा बांधा मजबूत असून रूपानें तो फार देखणा होता. त्याचा चेहरा पाणीदार व मनोरम होता. त्याची वागणूक मोहक होती ; व त्याचें शरीरसामर्थ्य अलौकिक होर्ते. त्याच्याने मोठे कष्ट