या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७६ अकबर बादशहा. सहन करवत. घोड्यावर बसणें, रपेट करणें, निशाण मारणें, शिकार करणें, व याशिवाय ज्यांत सामर्थ्य व कौशल्य लागतें अशा व्यायामांची त्यास फार आवड असे. तो मोठ्या छातीचा व धीराचा असे. त्याचें धैर्य प्रसंग कधी डगमगलें नाहीं ; उकट, अडचणीच्या व धोक्याच्या प्रसंगों तें विशेषच चमके. लढाई करण्यास, - विशेर्षेकरून राष्ट्राच्या हिताकरितां व प्रजेच्या कल्याणाकरितां ती अवश्य वाटे तेव्हां - तो एका पायावर तयार असे. तथापि त्यांत त्याला आनंद नसे. आपली सत्ता व आपला अधिकार प्रजाजनांच्या संतोषावर अवलंबून आहे असें त्याच्या मनानें घेतकें होर्ते. ह्मणून, जेणेकरून त्यांचा संतोष वाढेल व सुख व शांतता वृद्धिंगत होऊन आपला अधिकार सुस्थिर होईल अशा उपायांची निरंतर योजना करणे ह्यांत लढाईपेक्षां त्यास कितीतरी अधिक आनंद वाटे. कढाई ह्मणजे एक न टाळतां येणारें अनिष्टच असें तो समजे. त्याच्या एकंदर कारकीर्दीत असे आढळून येईल की, त्यानें अशी एकही लढाई केली नाहीं कीं जी त्यास स्वतःच्या राज्यां- तील मुलकी कामाची व्यवस्था संपूर्ण अवस्थेस आणून बिनधोक करण्या- साठीं अवश्य अशी वाटली नाहीं. त्याचा स्वभाव ममताळू होता. तो स्नेह्यांशीं अकृत्रिमपणानें वागे. आपल्याविषयीं इतरांच्या मनांत प्रेम- भाव उत्पन्न करण्याची हातोटी त्यास चांगली साधली होती. रक्त- स्रावाचा त्यास तिटकारा असे. न्यायपद्धतींत अनुकंपेचें संमेलन करण्या- विषयीं त्याची इच्छा असे. अपराध्यांस दंड करतांनां सुद्धां तो दया- शीलता सोडीत नसे. तो मोठा क्षमाशील होता. वैरानि धुमसत ठेवून सूड उगवावा त्यापेक्षां क्षमा करून मन शांत ठेवावें हें बरें असें तो मानी. ' वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि ' या उक्तीप्रमाणें त्याचें अंतः- करण जात्या उदार होतें, तथापि जरूरच पडे तेव्हां त्यास तें वज्रा- सारर्खे कठीण ही करतां येई. सर्व थोर मनाच्या लोकांप्रमाणे इतर जनांच्या संतोषांत व आनंदांत भर घालण्याची त्यास अतोनात हौस ०