या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १० वा. ७७ असे. औदार्य हे एक त्याच्या नैसर्गिक प्रकृतीचाच भाग होऊन गेलेलें होतें. ज्य़ावर उपकार केला तो बेमान झाल्यास आपलें औदार्य अस्थानी गेलें याबद्दल त्यानें खेद मानूं नये; उलट त्यास सुधारण्याविषयीं त्यानें यत्न करावा. लष्करी खात्यांतील कारभारापेक्षां मुलकीकडील राज्यव्यव- स्थेची जात्या त्यास जास्त आवड असे; मोहिमेची योजना करण्यापेक्षां • आपण बाहुबलाने उभारीत आहों ती राज्यरूपी इमारत लोकांच्या इच्छे- नुसार रचली जावी अशाबद्दल बेत व मसलती करणें त्याला जास्त पसंत पडे. धर्म, राज्यव्यवस्था, न्यायपद्धति इत्यादि मनुष्यसमाज संबंधीचे जे जे विषय सर्व युगांत महत्वाचे ह्मणून गणिले आहेत त्या सर्वांचे संबंधों अकबरांचें मन खुलें व शुद्ध असून, त्यांत दुराग्रहांस जागा नव्हती. व त्यांसंबंधी ऐकण्यास तो सदा तत्पर असे. तो जन्मतः मुसलमान होता, व मह- मुदीय धर्मीतच तो लहानाचा मोठा झाला होता. तरी बौद्ध, ब्राह्मण, पारशी व ख्रिस्ती या धर्माच्या अनुयायांशीं तो मोकळ्या मनानें व बरोब- रीच्या नात्यानें वागे. त्याच्यावर कित्येकांचा असा आक्षेप आहे क वृद्धापकाळीं त्याला विद्वज्जन आवडेनातसे झाले व त्यांस दरबारांतून त्यानें हांकूनही लाविलें. या विधानांत फारसें तथ्य आहे असें आह्मास वाटत नाहीं. ह्यापेक्षां असें ह्मणर्णे अधिक रास्त होईल कीं, त्याचे दरबारांत येणाऱ्या विविध धर्मपंडितांच्या अविचारी कल्पना, दुराग्रह, व लहानपणापासून अंगीं खिळलेल्या समजुतींविषयींचे हट्टवाद ह्यांचा त्यास तिटकारा आला. खरोखर पाहिलें असतां, या पंडित लोकांतील अवगुण व दोष, ह्मणजे त्यांच्या ठायीं असलेली अपरिमित पुराण- प्रियता, दुराग्रह, हट्टवाद व असमंजसपणा यांचा अकबरास कंटाळा येई व या दोषांचा अतिरेक झाला तेव्हां त्यांस दरबारांत येणें बंद केले. · एव्हीं तो कसा होता है वाचकांस ह्या ग्रंथाच्या शेवटल्या भागांत पूर्णपणे संमजून येईल. येथवर केलेल्या वर्णनावरून या नृपकिशोराच्या अंगीं नवीन कोणी कांहीं सांगितकें तर तें