या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८ अकबर बादशहा. अप्रगट आक्रमशक्ति केवढी होती व तींत गुणविशेष काय होता याचें दिग्द- र्शन वाचकांस स्पष्टपणे झार्के असेल. वैरामखानाच्या शिक्षणाखाळ तयार होऊन चौदावे वर्षी पानिपतची लढाई मारून कोठें मुक्काम न करितां तो एकदम दिल्लीवर चाल करून गेला, त्या वेळीं त्याच्या बुद्धिवैभवाची विशा- लता व स्वभावसामर्थ्य, व मानसिक शक्तीचें तेज सभोवताली असणाऱ्या अमीर उमराव व सरदारांपैकी थोड्यांच्याच ध्यानांत आले असेल. पण निदान बैरामखान यास तरी अकबराचा स्वभाव व बुद्धि पुरी कळली नव्हती हें मात्र निःसंशय आहे. एरव्हीं सरहिंद येथें आपल्या तंबूंत टारडीवेग यास त्यानें दग्यानें मारिलें नसतें; किंवा त्या तरुण राजपुत्रास युद्धांत काबीज केलेल्या हेमूच्या रक्तानें आपल्या तळवारीस स्नान घालण्या- विषयींची सल्ला दिली नसती. परंतु त्यांचा भ्रम लवकरच दूर झाला. हुमा- युनाचा मुलगा ह्मणजे वाटेल तसा वागविला जाणारा मूल नव्हे तर आपला हुकूम मानावयाला लावणारा धनी आहे असें बैरामखान व दरबारांतील इतर अमीर उमराव आणि लष्करांतील सरदार यांस लवकरच समजून आलें. अकबर एक महिनाभर दिल्लीस राहिला. हेमूच्या मोड झालेल्या सैन्याचा पाठलाग करण्याकरितां व त्यांच्याजवळ असलेला खजीना आणण्याकरितां त्यानें मेवातांत आपले लष्कर रवाना केलें. या लहा- नशा मोहिमेंत त्याचा सरदार शरखान येथील पीरमहमदखान यानें मोठा विजय संपादिला. या वेळीं हा सरदार बैरामखानाचा अनुयायी होता. परंतु पुढे थोडक्याच दिवसांत त्यांच्यांत द्वेष माजला व वैराम- खान हात धुऊन त्याच्या पाठीस लागला. नंतर अकबराने आग्र्यावर स्वारी करून तो प्रांत पुनः हस्तगत करून घेतला. परंतु, जॉवर पंजाब प्रांत मिष्कंटक झाला नव्हता तोंवर सतलज नदीच्या दक्षिणेस त्यानें संपादिलेले प्रांत ही निर्भय नव्हते. आपणांस माहितच आहे कीं मोंगल घराण्याचा पक्का हाडवैरी शिकंदर सूर ह्यास अकबराने जरी मानकोट पर्यंत मार्गे हटविलें होतें तरी त्याचा पुरता