या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १० वा. ७९ पाडाव न करितां त्यास तसेंच सोडून द्यावें लागलें होतें. नंतर, पुढच्या वर्षी (१५५७ ) मार्च महिन्यांत अकबरास असें वर्तमान सम- जलें कीं आपण, पंजाबांत ठेविलेल्या सैन्यापैकीं अघाडीच्या फौजेंतील एका टोळीचा लाहोरापासून चाळीस मैलांवर ह्या शिकंदरानें पराभव केला. पंजाबाहून कांहीं सरदार मंडळी परत आली, त्यांनीं असें कळ- विलें कीं या वेळचा प्रसंग मोठ्या आणीबाणीचा आहे; कारण मान- कोट येथील त्याचें ठाणें सुरक्षित व बळकट आहे तो पर्यंत शिकंदर शाहाचा इतर रणांगण पराभव झाला तरी त्यास मानकोटाहून बादशाही मुलुखास वारंवार त्रास देतां येईल. शिवाय, त्याचा जय होत गेल्यानें त्याच्या पक्षांतील लोकांस जोर व उत्साह ही आला आहे. सरदारांच्या बोलण्याचा झोंक अकबराचे लक्षांत आला व त्यांचें ह्मणणें खरें असेंही त्यानें कबूल केलें. आणि त्याच्या राज्याची सद्दी होऊन त्यास ज्या तत्वाने मजबुती आली तें तत्व, ह्मणजे "कोणतेही काम करावयाचे तर ते अगदीं पुरर्तेपणीं करावयाचें” ह्या तत्वानुसार ह्या प्रकरणाचा निकाल लावावा असा त्यातें निश्चय केला. तो नीट लाहोरावर चाल करून गेला. सुरक्षित आहे असें पाहून त्यानें जालंदरावर स्वारी केली. शत्रु आपला तळ देऊन बसलेला होता. तांच शिकंदरशहा शिवालिक नांवाच्या कोटच्या किल्ल्यांत जाऊन राहिला. ती राजधानी येथेंच त्याचा अकबर या ठिकाणी पोहोंच- डोंगरांत परत गेला ; व मान- तेथें अकबरानें त्यास वेढा घातला. किल्ल्यांतील दाणागोटा संपला व हा वेढा सहा महिने राहिला. रखवालदारांतील पुष्कळ लोक निघून गेल्यामुळे बलहीन होऊन, आपला टिकाव लागत नाहीं असें पाहून शिकंदरशहानें आपल्या सरदारांस तहाचें बोलर्णे लावण्यास पाठविलें. अकबरानें त्याचें ह्मणर्णे मान्य केले व असें ठरविलें कीं 'शिकंदरानें माघार घेऊन बंगाल्यांत परत जावें व आपण बादशहार्शी पुनः लढाई करणार नाहीं असें वचन द्यावे व त्यासाठीं आपला मुलगा ओलीस द्यावा. नंतर मानकोटचा किल्ला अकबरास