या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८० अकबर बादशहा. वश झाला ; व अकबर तेथून लाहोरास परत गेला. तेथें तो चार महिने चवदा दिवस त्या प्रांताची व्यवस्था लावण्याकरितां राहिला व नंतर दिल्लीस परत गेला. मार्गात जालंदर मुक्काम माजी बादशहा हुमा- यून याच्या एका कांबचे बहिणीचें नार्वे असणान्या स्त्रीशों बैरामखानाचें लग्न झालें. हा संबंध हुमायुनानेंच जुळविला होता व सर्व योजना तेव्हांच ठरली होती. शहाजादा अकबर यास असल्या गोष्टींत आपल्या वडिलांची इच्छा कायद्याप्रमाणे शिरसावंद्य असे. तारीख १५ मार्च १९१८ इ० रोजीं अकबरानें दिल्लींत पुनः प्रवेश केला. हा काल पावेतों खरोखर सर्व कारभार बादशहाचा मुख्य मंत्री व गुरु जो बैरामखान ह्याच्याच खुद हातीं होता. व पुढील दोन वर्षांत ( १९९८ - १५९९ ) हीच व्यवस्था कायम राहून सर्व राज्यसूत्रे बैरामखानाच्याच स्वाधीन राहिली. ज्या बलाढ्य योद्ध्याच्या हाताखाली आपले सर्व शिक्षण झाले त्याचें वजन एकदम झुगारून देण्याचें काम त्या अल्पवयी कुमारास सोपें नव्हतें. आपल्या नांवावर अतालिक बैरामखान याने केलेली अनेक कृत्यें अकबरास संमत नव्हतीं, तथापि त्याचें जूं काढून टाकण्या इतकी ताक आपले अंग आली नाहीं असें अकबरास वाटत होतें हें संभवनीय आहे. परंतु, अकबरास प्रिय असे लोक बैरामखानानें निष्कारण र त्याजवळून जुलमानें काढून घ्यावे असा क्रम बरेच दिवस चालल्याने बादशहार्चे मन आपल्या अतिस्वायत्त अतालिकावरून हळू हळू उडालें. वैषम्याची एकदां सुखात झाल्यावर तें वाढतच गेलें. अकबराच्या स्वभावांत प्रतिवर्षी जाज्वल्य व तेजोमय गुणराशी संवृद्ध होत आहेत त्याच्या नैसर्गिक वुद्धिकौशल्यांत अनुभवाची व राज्यकारभारास लाग- णाऱ्या ज्ञानाची भर पडत आहे, या गोष्टी बेरामखानाचे नजरेंत आल्या. नाहींत. ज्यास आपण कान धरून शिकविलें, ज्याचें सैन्य समरां-- गणांत नेऊन विजयी केलें, व ज्याचें राज्य आपण अनियंत्रितपर्णे :- चाळवीत आहों तो आपला धनी अकबर अद्याप केवळ पोर आहे, असें