या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १० वा. ८१ बैरामखान यास अझूनही वाटत होतें. आजपर्यंत स्वैरपर्णे अंमल गाज- विल्यामुळे अनिर्गलरीत्या वागणें त्यास अवश्य झालें होतें ह्मणून “मनः पूतं समाचरेत्” या न्यायाने आपल्या विलक्षण हेकेखोर स्वभावास अनुसरून स्वाभिमानाने सत्ता चालवीत होता. राजा अल्पवयी असला ह्मणजे वाजवी रीतीनें त्याने जी सत्ता व अधिकार चाळवावयाचे ते दुसऱ्याने चालविले असतां त्यापासून आपले व गादीवर असलेल्या राजाचे फार मोठें नुकसान आहे असें मान- णा-या मंडळीचा त्याच्या भोंवतीं नेहमीं थवा असावयाचाच. त्या मंड- ळीची अशी प्रवृत्ति का होते याचे कारण शोधीत बसण्याचें प्रयो- जन नाहीं. येवढे मात्र खरें कीं, कोणत्या तरी कारणांवरून, - अनेक प्रसंगी हीँ कारणें आपस्वार्थी असतात, कदाकाळी विशुद्ध व निरपेक्ष प्रकारचींही असतात,-या मंडळीला असें वाटतें कीं, जो खरोखर गादीचा मालक आहे तो अल्पवयी असला तरी सर्व सत्ता त्याचे हाती असावी व राजकृपेचा प्रसाद त्याचेच हातून वाटला जावा. अशा प्रकारच्या लोकांचा थवा अकबराचे सभवत होता ही गोष्ट ही निर्विवाद आहे. यापैकी कित्येकांना बैरामखान अगदी अप्रिय झाला होता, कित्येकांचें बैरामखान यार्ने नुकसान केलें होतें, कित्येकांचा तो वैरी झाला होता, व कित्येकांस बादशहा स्वतंत्र झाला तरच आपला भाग्योदय होईल अशी उमेद होती. ह्या सर्व लोकांच्या डोळ्यांत बैरामखान खुपत होता त्याची उचलबांगडी करण्यास ते अत्यंत उत्सुक होते. या संबंधानें झनान्यांतून ही भीड येऊन पडली; ती अशी. अकबराची एक दाई असे. या दाईनें त्यास आपल्या पायावर न्हाऊं धुऊं घालून लहानाचे मोठें केलें होतें व तो गादीवर बसला तेव्हां ही त्याचेच पार्शी होती. पुढे ती बादशाहाचे जनानखान्यावरील मुख्य अधिकारीण झाली. ती 'त्यास आग्रहपूर्वक ह्मणे कीं आतां आपण मोठे झालांत तेव्हां आपलें राज्यशकट स्वतः हांकार्वे अशी आतां वेळ येऊन पोहोचली आहे. ० 11