या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८२ अकबर बादशहा. अकबर ही अर्से करण्यास उत्सुकच होता. तो आतां अठरा वर्षांचा झाला होता. पानिपतची लढाई होऊन चार वर्षे लोटलीं होतीं, तितक्या अवकाशांत त्यानें आपले वडिलोपार्जित राज्य बऱ्याच अंशी पुनः हस्तगत करून घेतलें होतें. त्याचें नैसर्गिक गुण- गांभीर्य या अवस- रांत वृद्धिंगत होऊन प्रगल्भ दशेस येत चाललें होतें. परंतु, जरी अता- ळिक बैरामखान याच्या स्वैरवर्तनाचे व दुष्ट व क्रूर कृत्यांचे मासले अकव- राच्या पदोपदीं नजरेस येत असत व ते त्याला अगदीं असंमत असत; तथापि ज्यानें आपल्यास बालपणापासून शिकविलें त्या गुरूविषयीं प्रत्येक उदारधीच्या अंतःकरणांत जी स्वभावजन्य पूज्यबुद्धि असते ती अकब- राचे अंतःकरणांतही वसत होती. त्यास बैरामखानाच्या स्वभावाचा पूर्ण परिचय झालेला होता. सबब त्याच्याशी बिघाड करावयाचा तो कायमचा व परिपूर्ण असाच केला पाहिजे व त्यास कामावरून .एकदां दूर केलें ह्मणजे त्यास पुनः अधिकार चालविण्याचे मनांतही येऊं नये अशी व्यवस्था करणें अवश्य आहे हें अकबर पूर्णपणे जाणून होता. बैरामाच्या हवालीं एक तर संपूर्ण सत्ता केली पाहिजे नाहींपेक्षां मुळींच सत्ता नसली पाहिजे, नाहीं तर अपाय व्हावयाचाच हें अकबरा पक्के माहीत होतें. इ० स० १५६० च्या प्रारंभी अशा अनेक गोष्टी घडून आल्या की ज्यांमुळे राज्यवेत्र आपल्या हातीं ताबडतोब घेण्याचा अकबराने पक्का निश्चय केला. हा कृतसंकल्प आपल्या अतालिकास विदित करण्या- करितां तो आग्र्याहून दिल्लीस जाण्यास निघाला. प्रतिस्पर्ध्याच्या पेचांतून अथवा एखाद्या विशिष्ट सरदाराच्या तापांतून मोकळे होण्याचा एक उपाय बैरामखानानेंच अनेक वेळां दाखविला होता. तो उपाय झणजे जंबिया किंवा तरवार. परंतु असल्या उपायांचा अकबरासारख्या शुद्ध मनाच्या पुरुषास तिटकाराच असावयाचा व त्या वेळच्या इतिहासा - घरून अशा प्रकारची योजना त्याला कोणी ही सुचविली होती असे दिसत