या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर बादशहा.

झालेली अंधाधुंदी व फांकाफांक नजरेस येतांच त्यानें त्या देशाच्या मैदा- नांवर अगदीं अनिवार जोरानें झडप घातली. असा हा बावर; त्याच्या विचाराची मजल तत्कालीन विचारांच्या फार पुढे गेलेली होती. तो उदार व मायाळू असून उदात्त विचाराचा होता.तथापि हिंदुस्थानाश त्याचें नातें फक्त लढाई जिंकणारा योद्धा या पलीकडे गेलेलें नव्हतें. ज्या राज्यकारभाराच्या पद्धतीचा त्याला आजन्म परिचय होता व जी पद्धति त्याच्यापूर्वी हिंदुस्थान जिंकणाऱ्या अफगाण राजानीं सुरू केली होती, तीहून अन्य पद्धतीविषय विचार करण्याला त्याला अवकाशच फावला नाहीं. ही पद्धति ह्मणजे राज्याचे मोठमोठे विभाग करावयाचे, व प्रत्येक विभागांत नाक्याचीं ठिकार्णे पाहून तेथें छावण्या देऊन, त्यांवर राजनिष्ठ सरदारांची योजना करून, त्यांचे हातानें, सैन्याच्या जोरावर राज्यकारभार चालवावयाचा, ही होती. हिंदुस्थानांत नव्हे, तर मध्य- एशियांत राज्य स्थापन करावें हें बाबरच्या राजनीतीचें मुख्य धोरण नव्हर्ते की काय, हा प्रश्नच आहे.
 ह्या, वर वर्णिलेल्या राज्यव्यवस्थेचे पद्धतींत देशांतील प्रजेचे सुख- समाधानाकडे फारसे लक्ष नसे. यदाकदाचित् बाबर आणखी बरेच दिवस वांचता व त्याचें बुद्धिसामर्थ्य तसेंच कायम राहतें, तर नातू अकबर याप्रमार्णे, त्याचेही नजरेस असें आलें असतें की ही पद्धति व्यवहारदृष्ट्या दोषमय आहे. राज्यव्यवस्थेचे मुख्य तत्व जी सुसंगता ती या पद्धतीने कधींच साधत नाहीं. त्याचप्रमार्णे, जिंकणारे व जिंकिलेके या उभयतांचें हिताहित एकमेकाश साधून देण्याचें ही तत्व तींत नाहीं. तिच्या योगानें प्रजाजनांत राज्यकर्त्यांविषयीं अनुरक्ति उत्पन्न करितां येत नाहीं. त्यांच्या मनांतील दुराग्रह नाहींसे करून तीस त्यांना आपलेसे ही करून घेतां येणार नाहीं. हिच्या योगाने राज्याचा पायां बळकट होऊन तें दुर्दैवाच्या सपाढ्यांत न डगमगणारें होईल, असा संभव नाहीं. बाबरनें स्वतः आपके वृत्त लिहून ठेवलें आहे, त्यावरून त्याशीं आपला पूर्ण