या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नाहीं. भाग १० वा. ८३ त्याच्या आईनें व दाईनें सुचविलेला मार्ग फार निर्मळ व अगदीं साधा होता. त्यांची सल्ला अशी होती कीं, अकबरानें बैरामखान या मक्केच्या यात्रेस जाऊन देहाची सार्थकता करून घ्यावी असे सुचवावें; व ही सूचना त्यास अशा रीतीने कळवावी कीं तो अननुलंध्य आज्ञा सम- जून त्यानें पाळावीच. वैरामखान यानेही पुष्कळदां जाहीरपणे असें बोलून दाखविलें होतें कीं, राज्यकारभाराचे ओझें आपल्या डोक्यावरून काढून मालकाचे स्वाधीन निर्धास्तपणे करण्याचा सुदिन कधीं येईल, व देहाचे सार्थक करण्याकरितां तीर्थयात्रेला जाण्यास मी कधीं मोकळा होईन, असे मला झार्के आहे. त्यानें शस्त्र घेऊन उठूं नये णून अकरा अतिशय खबरदारी करून ठेविली, व दिल्लीत दाखल झाल्यावर त्यानें एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यांत असे फर्माविलें कीं, आजपासून सर्व राज्यकारभार आम्ही आपले हातीं घेतला आहे व इतउप्पर आमच्या खेरीज इतरांचे कोणाचेही हुकुम मान्य होऊं नयेत. अकबरानें बैरामखान यास आज्ञापत्र पाठविलें कीं “आपल्या प्रामाणिकपणावर व स्वामिभक्तीवर आमचा पूर्ण विश्वास असून आजपर्यंत सर्व राज्यकारभार आपल्या अंगावर टाकून ऐषआराम व चैन यांशिवाय दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष दिलें नाहीं. इतउत्तर राजवेत्र आह्म आपल्या हातीं धारण करण्याचा निश्चय केला आहे. मक्केच्या यात्रेस फार दिवसांपासून जाण्याचा आपला मानस आहे, तरी तो आतां आपण परिपूर्ण करणें इष्ट आहे. आपल्या निर्वाहाकरितां हिंदुस्थानांतील कित्येक परग- ण्यांची जहागीर आपल्या तैनातींत देण्यांत येईल व उत्पन्न होणारी जमाबंदीची रक्कम आपण नेमाल त्या मुखत्यारामार्फत आपलेकडे खाना करण्यांत येईल." हें पत्र पोहोंचण्यापूर्वीच अकबरानें केलेला निश्चय बैरामखानाचे कानी आला होता. ह्मणून आप्रा सोडून तो पश्चिम किनाऱ्याकडे जाण्यास अगोदरच निघाला होता. त्याची तब्यत अर्थात गरम झाली व द्रोहभावानें त्याच्या बुद्धींत फरक पडला, कांहीं