या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अकबर बादशहा. तरी धिंगामस्ती करावी असा त्याचा निश्चयही दिसून आला; कारण, बियाना येथें पोहोंचल्यावर तेथें कांहीं असल बंडखोर सरदार कैदेत होते त्यांस त्यानें बंदमुक्त केलें. याच ठिकाणीं त्यास अकबराचा निरोप पोहोंचला तेव्हां तो तेथून राजपुतान्यांत नगोराकडे गेला. समागमें, आप्तवर्गा- पैकीं कांहीं सरदार मंडळी व त्यांच्या पदरी असलेले नौकरचाकर इत- केच कायते होते. नगोराहून ह्यांपैकीं एका सरदाराबरोबर आपण हुजूरची आज्ञा शिरसावंद्य केली ह्यांचें दर्शक ह्मणून आपला झेंडा, नौबत, व अमीरीची इतर सर्व चिन्हें बादशहाकडे खाना केलीं. इकडे, बैरामख़ान पंजाबांतील लोकांस फितूर देऊन आपल्या विरुद्ध बंड कर- ण्यास प्रवृत्त क़रीक अशी अकबराची खात्री केली गेल्यामुळे, तो दळ- भार घेऊन तिकडे जाण्यास निघाला. ह्या स्वारींत रोहाटक जिल्ह्यांत झाझर येथें मुक्काम असतां, बैरामखान यानें परत केलेलीं अतालिकाचीं. चिन्हें येऊन पोहोंचली. तीं त्यानें आपल्या एका सरदारास देऊन अनुग्रहीत केलें. हा सरदार पूर्वी बैरामखानाच्या कृपेंतील होता, परंतु अलीकडे त्यावर त्याची मर्जी खपा झाली होती. अकबरानें ह्रीं चिन्हें त्या सरदारास देऊन आपल्या जुन्या यजमानाचा पाठलाग करावा व त्याची मक्केस बोळवण करावी ही कामगिरी त्याजकडेस सोपविली. यामुळें बैरामखानाचें मार्थे अगदीच फिरून गेलें. तो लागलींच बिकानेरवर परतला. तेर्थे स्वतःचा झनाना व मुलैमाणसे आपल्या दत्तक पुत्राच्या स्वाधीन करून त्यानें उघडपणे बंडाचा झेंडा उभारला. परंतु, मोंगल बादशाहाविरुद्ध उठलेला बंडखोर व त्याचा विश्वासुक अतालिक यांत किती मोठें अंतर आहे हे त्यास अद्याप कळलें नव्हतें.. तें आतां त्याच्या अनुभवास आलें. तो दिपालपूर येथें पोहोंचला तेव्हां, त्यास कळलें कीं आपला दत्तक मुलगा सोपविलेली कामगिरी न बजा- वतां बादशाहासच जाऊन मिळाला, तथापि त्यार्ने जालंदरदुआबांतील प्रांतांत उठावणी करून आपले बंड वाढविण्याचा निश्चय केला. त्या