या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १० वा. सुप्रसिद्ध शहराकडे वळतो तों मार्गात पंजाबच्या सरहद्दीवर तेथील सुभे - दार अतनाखान सैन्यासह लढाई देण्यास तयार होता त्याची याची गांठ पडली. लढाई झाली तींत बेरामखानाचा पराभव झाला. तेव्हां त्यानें तिलवाऱ्याकडे पळ काढला. हे ठिकाण लुधियानाच्या पश्चिमेस तीस मैलांवर सतलज नदीच्या कांठीं आहे. अकबर बैरामखानाच्या पाळ- तीवर होताच, त्यास ह्या लढाईची व पलायनाची बातमी लागतांच तो आपल्या अतालिक बैरामाचा पाठलाग करण्यास निघाला. अक- बराने त्याच्या नाकी नव आणून त्यास त्राहि त्राहि करावयास लाविलें. तें इतकें कीं, शेवटीं बैरामखान त्यास पूर्ण शरण आला. त्यानें पूर्वी बजाविलेल्या मोठमोठ्या कामगिऱ्या मनांत आणून अकबरानें त्याला क्षमा केली व समागमें विपुल संपत्ति व सामुग्री देऊन त्यास मक्केच्या मार्गास लावून दिलें. बैरामखान गुजराथेंत सुखरूप पोर्होचला. तेथील सुभेदाराने त्याचा सत्कार उत्तम रीतीनें केला. तो हिंदुस्थान सोडण्याच्या तयारीस लागला असतां एका लोहाणी अफ- गाणाने पूर्वीचें कांहीं वैर स्मरून त्याचा दग्यार्ने प्राण घेतला. त्यानें त्याच्या पाठींत जंबिया खुपसला तो त्याच्या छातींतून बाहेर निघाला. त्यासरशीं “अल्ला हु अकबर" येवढें ह्मणून त्याने प्राण सोडला. इकडे, या अवकाशांत अकबर दिल्लींत परत येऊन पोहोंचला ( नोवेंबर ता. ९ सन १९६० ). थोडे दिवस तेथे राहून त्यानें विश्रांति घेतली. नंतर तो आग्र्यास गेला. नंतर, निरनिराळे प्रांत जिंकून त्यांच्यांत ऐक्यभाव व दृढभाव उत्पन्न करावा व त्या सर्वोस खऱ्या एकछत्राखाली आणून त्यांचें एक संमीलित राष्ट्र बनवावें ह्मणून त्यानें जो कृतसंकल्पव निर्धार केला होता तो तडीस नेण्याच्या खटपटीस तो लागला. आजपर्यंत, “नाकापेक्षां मोती जड " या ह्मणीप्रमाणे शिरजोर होऊन बसलेल्या व आपण बादशहा आहों अशी घमेंड मारून सर्व राज्यका - रंभाराची सूत्रे आपल्याच हातीं वागविणाऱ्या अशा अतार्किक बैरामाचें