या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८६ अकबर बादशहा. राज्य चाललें होतें असें ह्यटलें पाहिजे. यापुढे, अकबर हा खरा राज झाला व त्याच्या कारकीर्दीस खरोखर आज तारखेपासूनच सुरवात झाली. सर्व सत्ता बळकावून बसलेला अतालिक बैराम आतां राज्यांतून गेला, व इतउत्तर राज्याची भरभराट व देशांतील सुखसंपत्ति केवळ तक्तावर बसलेल्या बादशहाच्या बुद्धिसामर्थ्यावर अवलंबून राहिली. भाग अकरावा. 1801 अकबराच्या कारकीर्दीचा वृत्तांत. ॥ न खरो नच भूयसा मृदुः ॥ पवमानः पृथिवी रुहानिव ॥ ॥ स पुरस्कृत मध्यमक्रमो || नमयामास नृपान नुद्धरन् ॥ जो न प्रचंड मंद हि ऐसा वायू तरू जसा नमवी ॥ ठेवी पदों परी तो इतर नृपां शरण यावया लावी ॥ पंजाब व पानिपतची लढाई होऊन पांच वर्षे लोटलीं. नंतर साहावे वर्षों ह्मणजे अकबर स्वतंत्रपणें राज्य करूं लागल्यापासून पहिलेच वर्षी, राज्याची स्थिति कशी होती, याचे थोडक्यांत दिग्दर्शन करूं या. सध्यां वायव्येकडील प्रांत हाणून प्रसिद्ध असलेला प्रदेश अकबराच्या अंमलाखाली होता. यांत पश्चिमेस ग्वाल्हेर व अजमीर व पूर्वेस लखनौ, अयोध्या, अलाहाबाद व जोनपुरापर्यंतचा मुलूख येत होता. बनारस, चनार आणि बंगाल व बिहार या प्रांतांत सूर अथवा अफगाण घराण्यां- तीळ राजे राज्यकारभार चालवीत होते. सर्व दक्षिण हिंदुस्थान व पश्चिम हिंदुस्थानांतील बहुतेक भाग यति अकबराचा अंमल अद्याप बसला नव्हता. बैरामखानाचे हाताखालीं पांच वर्षे राज्यकला शिकत असतां, हिंदुस्थानांतील अनेक जातींच्या जनसमुदायांचे व संस्थानिक राजांचें हृदय आपल्याकडे कसें ओढून घ्यावें व स्वतःचें राज्य त्यांस आपलें