या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८८ अकबर बादशहा. कोणचे जय मिळवून राज्याचे एकीकरण करावें; नवीन प्रांत जिंकीत असतां राज्यपद्धतीचीं कोणतीं तवें सुरू करावीं, कीं जीं रावापासून तों रंकापर्यंत सर्वांस सारखींच संमत होतील व ज्यांमुळे त्यांचे ठायीं आपल्या विषय पितृवात्सल्य व प्रेम उत्पन्न होईल, व ते आपणास त्यांचे अनिष्ट निवारणार्थ अवश्य भूति ह्मणून लेखतील ; व प्रजाजनांचे प्राची- न अधिकार व हक्क हा कायम ठेवील व राज्य कारभारांत शिया, सुन्नी, हिंदू, मुसलमान इत्यादि जातिभेद व धर्मभेद मनांत न बाळगितां केवळ गुणांचेंच चीज करील व सर्वावर सारखाच अंमल चालवून समदृष्टीनें व एकाच काट्यानें लहान मोठ्यांस न्याय देईल, अशी प्रजा- जनांची खात्री कशी करावी; ह्या गोष्टी त्याचे मनांत रात्रंदिवस घोळत होत्या. त्याचे विचार जसजसे परिपक्क झाले तसतशीं हीं राज्यशा- स्त्राची तत्वें त्याच्या मनांत खिळत गेलीं. कित्येक हट्टवादी मुसल- मान ग्रंथकारांचा त्याजवर असा आरोप आहे - हा आरोप त्याच्या हया- तींत देखील त्याजवर असे कीं तो आपल्या अंगीं ईश्वरी कर्तृत्व व ईश्वरी गुण आहेत असा वृथाभिमान बाळगीत होता. एके अथा आरोप कांहींसा खरा होता. कारण, ज्या काली व ज्या देशांत "बळी तो कान पिळी " अथवा बळ ह्याचा पर्यायवाचक शब्द हक्क अशी स्थिति होती, त्या वेळी व त्याच देशांत, लोकांत एकी, सहन- शीलता, न्याय, दया, व समसमान हक्क ह्यांचें साम्राज्य अंमलांत आणण्या- करितां परमेश्वरानें मुद्दाम पाठविलेला दूत किंवा प्रतिनिधी आपण आ असेंच तो स्वतःस लेखीत असे. त्याचा पहिला बेत सर्व हिंदुस्थान एका छत्राखाली आणावें व हें काम होता होईल तों जनसमुदायांची संमति व अनुकूलता संपादन करूनच साधावें असा होता. त्याच्या राज्यकारस्थानाचें हें धोरण पूर्ण- पर्णे ध्यानांत येण्याकरितां त्याचें विवेचन दोन दिशेनें केलें पाहिजे ; एक तर, त्यानें रणांगणीं कोणते पराक्रम केले यांचा व दुसरें, त्यांवर