या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ११ घा. समदृष्टीने राज्य करण्यासाठीं कोणच्या तत्वांवर राज्यपद्धति सुरू केली याचें वर्णन केलें पाहिजे. तेव्हां प्रथम त्या वेळच्या हिंदुस्थानांतील विविध राजेरजवाड्यांस एकछत्राखालीं आणण्याकरितां जी त्यानें प्रयत्न परंपरा आरंभिली तिचें निरूपण आपण या भागांत करूं व पुढील प्रकरणांत त्याच्या राज्यव्यवस्थेचें नैतिकदृष्ट्या काय स्वरूप होतें याचा विचार करूं. अकबरानें हिंदुस्थानांत केलेल्या मोहिमींचें सविस्तर वर्णन केलें असतां या सारख्या पुस्तकांत कंटाळवाणें होईल. यास्तव त्यांतील मुख्य मुख्य गोष्टी सांगितल्या असतां चालेल. गादीवर बसल्या- पासून सहा वर्षी व राजसूत्रे स्त्रतः आपल्या हातीं धारण केलीं त्याचे पहिले वर्षी त्यानें माळवा प्रांत आपल्या राज्यास पुनः जोडिला . याच वर्षांच्या अखेरचे मोसमांत, चनाटा, व कर्मनाशाचे पूर्वेकडील प्रांताच्या अफगाण राजानें जोनपुरावर स्वारी केली, व तिचा मोड अकबराच्या सरदारांनी केला व त्यास माघारा हटविलें. इकडे स्वतः अकबर कालपीचे मार्गानें तेथें जाऊन यमुना उतरून करापर्यंत जाऊन ठेपला.' हें ठिकाण अलाहाबादच्या नजीक गंगानदीच्या उजवेकडे आहे. येथें याला ज्या सरदारांनीं जोनपुराचा बचाव केला होता ते येऊन मिळाले; वं मग तेथून तो आग्र्यास परत गेला. साल अखेरच्या सुमारास मरटा शहरास अकबराने वेढा घातला. हें शहर जोधपूर संस्थानांत असून जोधपूर शहराचे ईशान्येस ७६ मैलांवर आहे. ते वेळीं ह्याची मोठी भरभराट व माहात्म्य असे. अकबर त्या वेळीं अजमीर येथें होता, व तेथूनच त्याने ही मोहीम चालविली होती; मात्र तिची प्रत्यक्ष देखरेख व व्यवस्था त्यानें आपल्या सरदारांकडे सोपविली होती. किल्ल्यांतील रजपूत शिपायांनीं तटाचा बचाव मोठ्या हिंमतीने व . शिताफीनें केला; परंतु पुढील सालीं वसंतऋतूंत त्यांनीं तो, आपकी मालमत्ता व धनदौलत किल्ल्यांत टाकून देऊन घोडे व हत्यारे 12