या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९०० अकबर बादशहा. घेऊन आपणांस सुखरूप बाहेर जाऊं द्यावें अशा शर्तीवर अकबराचे स्वाधीन केला. 1 मरठाचा किल्ला हस्तगत झाला तेच वर्षी ( १९६२ ) माळव्यां- तील अकबराच्या सरदारांनी पश्चिमेकडेस स्वारी करून बिजागड व तापी नदीच्या कांठचे बऱ्हाणपूर हीं दोन शहरें राज्यास जोडली. परंतु हा लाभ भावी अनर्थसूचक झाला. कारण, या दोन्ही शहराच्या परा- भूत झालेल्या सुभेदारांनीं माळव्यांतून हांकून लावलेल्या अफगाण राजाशी व पिढ्यानपिढ्या त्यांचे अंमलाखाली असलेल्या जमीनदार लोकांश एकजूट करून वादशाही सैन्यावर निकराचा हल्ला केला. हॅ. सैन्य ब-हाणपूर येथे मिळालेल्या प्रचंड लुटीच्या ओझ्यानें लादून गेल्या- मुळे त्याचा समूळ पराभव झाला; व माळवा क्षणमात्र हातचा गेला. परंतु मोंगल सरदारांना नव्या फौजेची भक्कम कुमक मिळून तें वर्ष पुरें: होण्याच्या पूर्वीच त्यांनीं तो प्रांत पुनः काबीज केला. माळव्यांतील. माजी अफगाण राजा बराच वेळ इकडे तिकडे भ्रमण करून अखेरीस : " असो सांपडतों तुझ्या करामार्जी " असें ह्मणून, ते वेळचा एक इति-- हासकार म्हणतो त्याप्रमाणे, जणूं काय दैवकटाक्षापासून रक्षण करण्या-- करितांच, अकबरास शरण गेला. तेव्हां अकबराने प्रथमतः एक हजारः फौज त्याचे हाताखाली दिली; व पुढे लवकरच दोन हजार सैन्याचे अधि- पत्याची त्यास मनसब दिली. या नवीन बादशहाच्या चाकरींतच देहावसान होईपर्यंत तो राहिला. या गोष्टीवरून शत्रूंना वश करून घेण्याचें तत्व अकबरास पूर्णपर्णे अवगत असून त्याप्रमाणे तो नेहमीं वांगत असे, हे वाचकांचे लक्षांत आल्यावांचून राहणार नाहीं. हैं तत्व कोणतें ह्मणाल तर पराजित केलेल्या शत्रूंस निराश व हताश न होऊं देतां त्यांच्या योग्यतेनुरूप त्यांची मानमान्यता ठेवावी व त्यांची लायकी पाहून त्यांना हुद्याच्या व हुकमतीच्या जागा द्याव्या. त्याचा हेतु दुफळ्या मोडून सर्वांचें सम्मीलन करण्याचा होता'; ह्मणून पराजितः