या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ११ वा. ९१ झालेल्या शत्रूंशीं त्याचें वर्तन सदैव उदारशीलतेचें असे. त्याचें बळ व सामर्थ्य तो आपल्याचकडे वळवून घेई व होतां होईल तों त्यांस आपके शत्रु राहू देत नसे. जे प्रथमतः त्यास विरोध करण्यास उद्युक्त होत, त्यांना तो असें वाटावयास लावी की ह्यानें आपणास जिंकिलें किंवा आपण त्यास वश झालों, तरी त्या योगानें आपली मानहानि न होता उलट अखेरीस आपली बढती व उन्नतिच होईल. राजपुता- न्यांतील निरनिराळ्या राजांशीं जें त्यानें वर्तन ठेविलें त्याचें विवेचन करूं तेव्हां ह्या तत्वाचा व तदनुसार केलेल्या कृतीपासून काय गोड परिणाम झाला याचा विशेष परिस्फोट होईल. अकबरच्या राज्याच्या आठवे वर्षाचे आरंभी स्वच्छ आकाशांत काळा ढग येतो तशी एक मोठी खेदाची गोष्ट घडून आली. या दाईच्या - दुधावर तो लहानाचा मोठा झाला, व जिनें त्याची बाळपणी जोपासना केली त्या धात्रीवर त्याचें केवढे प्रेम होतें, व तिजवर केवढी भक्ति होती, हैं मार्गेच निर्दिष्ट केले आहे. - बैरामखानाचे बाबतीत अकबरानें जें आचरण केलें तें बहुतेक अंशीं या धात्रीच्याच सल्लामसलतीनें व धोरणानें केलें होतें. राजमंदिरांत तिची तरतूद मोठ्या थाटमाटाची व ऐषआरामाची ठेविली होती, व तिच्या मुलांची फारच सुरेख व उत्तम तऱ्हेची योजना अकबरानें करून दिली होती. परंतु त्यांपैकीं वडील मुलाचे मनांत त्याच्या मतें आपल्या बरोबरीचे किंबहुना आपल्याहून ज्यांची योग्यता कांकणभर कमीच असे लोक आपल्यापेक्षां मोठ्या पदवीस चढले, याबद्दल मत्सरबुद्धीचा विशेष प्रादुर्भाव होऊन, व कदा- चित इतर हेवेखोर मंडळींनी भर दिली ह्मणून, त्यानें बादशहाचा मुख्य वजीर दरबारांत बसला असतां त्याचा दग्यानें खून केला; व नंतर आपण व आपलें कुटुंब बादशहाचे विशेष कृपेंतील आहोंत अशा घमंडी- वर तो राजमहालाच्या दरवाज्यांत जाऊन उभा राहिला. परंतु, अशा मनुष्यास व अशा कृत्यास अकबराचेपाशीं क्षमा मुळींच नसे.