या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९२ अकबर बादशहा. त्याने त्यास देहांत शासन देवविले व त्याचे प्रेताचा कडेलोट करविला. त्यास उठावणी देणारी मंडळी आपलें कारस्थान उघडकीस येईल या भीतीनें घाबरून यमुना पार पळून गेली, तथापि त्यांस पकडून त्यांना आग्र्यास आणिलें व अखेरीस त्यांस माफी देण्यांत आली. राजाची दाई व मुख्य अपराध्याची आई आपल्या मुलाच्या दुर्वर्तनामुळे शोकाकुल होऊन पुढे चाळीस दिवसांनी मरण पावली. यापूर्वी कांहीं दिवसांपासून पंजाबातील एका भागाची स्थिति अक- बरास चिंता उत्पन्न करणारी अशी झाली होती. तेथील गखार नांवाच्या रहिवाशांनी, त्यांच्या प्रांतांत बंदोबस्त व व्यवस्था करण्याकरितां अकबरानें फरमाविलेले हुकूम धाव्यावर बसविले. हे लोक फार उर्मट `व बंडखोर असून त्यांच्या नायकांनी मोंगलांचा अंमल मनापासून कधींच ग्रहण केला नव्हता व अकबरानें नेमिलेला सुभेदार त्यांनी मान्य केला नाहीं. हे गखार लोक सांप्रत त्यांचे वंशज राहतात तेथें, ह्मणजे हल्लींच्या रावळपिंडी जिल्ह्याच्या ईशान्येस जो प्रांत आहे तेथें राहत असत. तेर्थे आपल्या हुकुमाची अंमलवारी होण्याकरितां अकबराने सैन्याची 'वानगी केली. व त्या सैन्याने कांहीं जोराच्या चकमकीत यश संपा- दून, त्या प्रांतांत पुनः सुव्यवस्था स्थापित केली. गखारांचा मुख्य सरदार कैद केला गेला व तो नजर कैदेत असतां - नांच मरण पावला. कालांत अनेक बंडाचे उद्भवले होते त्यांचाही अकबरानें मोड करविला. नंतर अबुलमआलि या नांवाचा हुमायुनाच्या अस्सल प्रीतीतील एक सरदार होता त्यानें अकबराविरुद्ध कट केला होता तो त्यानें मोठ्या शिताफीनें मोडून टाकिला. त्याचे प्रस्थ त्यानें अनेक वेळां मोडून टाकिलें होतें, पण आतां तो गर्वानें फारच फुगून मक्केच्या यात्रेहून परत येत होता. त्यानें एका असंतुष्ट अमीराशीं मसलत करून नारनुलानजीक बादशाही फौजेच्या एका तुकडीवर हल्ला करून ती कापून