पान:अकबर बादशाहा.pdf/१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२] [द्रुतविलंबित ]. कृति तुझी जगतीवर, ईश्वरा ! बघुनि उत्सुक दास तुझा खरा तव पदांबुजदर्शन वांछितो, ह्मणुनियां तुज सादर वंदितो. ४. [ शिखरिणी ]. दयामेघा ! पापानळ सतत जाळी शरिर हैं; मी दुःखानीमा पनि खत्पाद विरहें; अशा या पापात्म्यावरि करिं विभो लोभ अपुला; मला तारों आतां शरण जन हा येड़ तुजला. ५ [ पृथ्वी ]. विशुद्ध रमणीय हैं नभ कसें दयाळा ! असे ! aai दिसतसे अहा ! सकळ तारकाराष्ट्रसें; परी बघतसे तुला जन न पापि राज्यासनीं ह्मणोनि मज लाभ तो मुळिं न जीवनापासुनी. ६ [ हरिणी ]. बहुत शिणलों राया ! येवो तुला करुणा कशी, धरुनि मजला पोटाशी तूं कधीं वदसी मशों ? तुजवर बसो श्रद्धा देवा ! तुझें पद दाखवी, सहज मज तें अज्ञानाच्या तमांतुनि सोडवी. ७ १ तात्यांचें राष्ट्र.